महाराष्ट्र एक्स्प्रेस रिवापर्यंत वाढवू नका, गोंदियापर्यंतच ठेवा – खा. प्रफुल्ल पटेल यांना साकडे

गोंदिया: २४ जून – महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाकरांचा जीव असून, या गाडीचा विस्तार रिवापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय रद्द करून गोंदियापर्यंतच ही गाडी ठेवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीने खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर ते गोंदिया दरम्यान धावते.
ही गाडी गोंदियाकरांकरिता महत्वाची आहे. ही गाडी गोंदियाच्या हक्काची आणि अस्मितेची प्रतीक आहे. मात्र ही गाडी गोंदियाकरांकडून हिरावून तिचा विस्तार रिवापर्यंत करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही गाडी गोंदियावरूनच सोडण्यात यावी. अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीच्या वतीने करण्यात आली आहे. त्याकरिता खासदार प्रफुल्ल पटेल यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खा. पटेल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सूरज नशिने, दिव्या भगत पारधी, हरीश अग्रवाल, लक्ष्मण लधानी, राजेंद्र कावडे, अकील नायक, स्मिता शरणागत, भेरूमल गोपलानी उपस्थित होते.

Leave a Reply