भरधाव कारच्या धडकेत माय-लेकरांचा जागीच मृत्यू

नागपूर : २४ जून – नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील लिहिगाव पोलिस चौकीसमोर चौपदरी रस्त्यावर सकाळी भरधाव मारुती कार चालकाने त्याच दिशेने जात असलेल्या दुचाकी वाहनाला धडक दिली. यात मायलेकाचा जागीच मृत्यू झाला.
भरधाव मारुती कार चालकाने अँक्टिवा क्र. एम.एच. ४0 / बी.एम. ३९१४ ला जोरदार धडक दिली. यात कामठी तालुक्यातील गादा येथील रहिवासी मनीषा गोपाल खुरपाडी (वय ४२) व अनिकेत गोपाल खुरपाडी या आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर कारचालक घटनास्थळी कार सोडून पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मनीषा खुरपडी आपली मुलगी पल्लवीच्या सासूरवाडीला उमरेड तालुका येथील वरूड गावाला जायला निघाले होते. यावेळी भरधाव वेगाने असलेल्या मारुती कारच्या चालकाने जोरदार धडक दिल्यामुळे आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत कामठी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. नवीन कामठी पोलिसांनी फरार आरोपी चालकाविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहे.

Leave a Reply