डॉ. मोहन भागवत यांनी केले दिवंगत स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

नागपूर: २४ जून- करोना संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी रुग्णसेवा केली. विविध वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. यातील काही स्वयंसेवकांचे करोनाने निधन झाले. अशा स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत भेट देत आहेत. माजी आमदार अनिल सोले यांचे बंधू अजित सोले यांचे निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानी सरसंघचालकांनी भेट दिली. केळकर, गजभिये आदी स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांचेही त्यांनी सांत्वन केले. लक्ष्मीनगरमध्ये २० ते २२ स्वयंसेवकांच्या निवासस्थानी भेटी देत त्यांच्या कुटुंबीयांशी डॉ. मोहन भागवत यांनी संवाद साधला, असे अनिल सोले यांनी सांगितले.

Leave a Reply