मुंबई : २४ जून – अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी व्हावी, असा प्रस्ताव प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत पारित करण्यात आला, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आज भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली. यात राजकीय प्रस्ताव पारित करण्यात आले. मराठा आरक्षणासंदर्भात भाजप मराठा समाजाच्या पाठीशी आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न वेगळा आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्याचबरोबर, ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी २६ तारखेला आम्ही राज्यातील हजार वेगवेगळ्या ठिकाणांवर आंदोलन करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.