वर्धा : २३ जून – कारंजा तालुक्यातील सेलगाव(उ) परिसरातील शेतकरी शेतशेजारील जंगलात माकड हाकलत असताना वन कक्ष क्रमांक १२१ मध्ये मादी बिबट आढळून आली तर गोट्याच्या खाली दोन पिल्ले आढळून आले. शेतकऱ्याला बिबट दिसताच घाबरून त्याठिकानांवरून परत शेतात परतला त्यानंतर ही माहिती गावात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिक बघायला येण्यापूर्वी मादी बिबट ने तिथून निघून गेली होती.
ही माहिती वनविभाग देण्यात आली त्यानंतर वनविभागाचे अधिकारी पोहचून पाहणी केली असता गोट्याच्या गुफेत दोन पिल्लांना जन्म दिला असावं असं अंदाज व्यक्त केला. हे दोन पिल्ले ८ ते १० दिवसाचे असल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी वनरक्षक यांना गस्त घालण्यासाठी ठेवण्यात आले.
नेकांना शेतात जाणाऱ्या मार्ग उपस्थित राहून तिथे लोकांना जाणे येणे बंद करण्यात आले . या स्थळी 2 कॅमेरे लावण्यात आले आहे.
आज रात्री बिबट आपल्या पिल्लं घेऊन जागा बदलवण्याची शक्यता आहे त्यासाठी या ठिकानावरून पिल्लांना बाहेर नेणार का यासाठी कॅमेरा लावण्यात आले आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. गायनेर ,डी. एल.खरबडे क्षेत्र सहाय्यक जुनापाणी ,एन. वाय. परतेतकी , सी. एस. उईके वनरक्षक बी. एस. डोबाले ,ओंकार चौधरी या परिसरात गस्त घालण्यात येत आहे त्या ठिकणी वन कर्मचारी उपस्थित होते.