नवी दिल्ली : २३ जून – राष्ट्रीय पातळीवर राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची बुधवारी दिल्लीत भेट झाली. महिनाभरात ही दोघांमधील तिसरी भेट आहे. यापूर्वी प्रशांत किशोर व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्यात सोमवारी भेट झाली होती.
प्रशांत किशोर यांनी ११ जूनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईला भेट घेतली होती. तेव्हापासून चर्चा सातत्याने होत आहे. या आठवड्यांमध्ये दोघांमध्ये दोनदा भेट झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याची चर्चा आहे.
मंगळवारी शरद पवार यांच्या निवासस्थांनी राष्ट्रमंचची बैठक झाली होती. या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा, गीतकार जावेद अख्तर, राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) अध्यक्ष जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेता उमर अब्दुल्ला, पूर्व जेडीयूचे नेता पवन वर्मा, सीपीआयचे खासदार विनॉय विश्वम आदी नेते सामिल होते. ही बैठक सुमारे दीड तास चालली होती.