एनी डेस्क अँपचा एक्सेस दिल्यावर बसला ९४ हजाराचा फटका

भंडारा : २० जून – तुम्ही ऐनी डेस्क या अँपचा वापर करत असाल तर सावधान. मोबाइलवर हे अँप डाऊनलोड करून दुसऱ्याला अँक्सेस देणे भंडाऱ्याचा एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. मोबाइलवर अँक्सेस मिळाल्यावर फोन पेद्वारे एका व्यक्तीने चक्क 94 हजार 990 रुपये तिच्या अकाऊंटमधून आपल्या खात्यात वळवल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आता ऑनलाईन चोरीसाठी ऐनी डेस्क वापरत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. त्यामुळे या अँपचा अँक्सेस अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले आहे.
भंडारा जिल्ह्याच्या पांढराबोडी गावातील सेलिना नावाच्या 21 वर्षीय तरुणीला तिच्या मोबाइलवर एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने फोन पे कंपनीचा मैनेजर अविनाश शर्मा असल्याची बतावणी केली. मोबाइलवर आलेले फोन पे चे नोटीफिकेशन वाचले नसल्याचे तरुणीला सांगितले. यामुळे फोन पे अकाऊंट बंद होणार असल्याची भीती घातली. फोन पे बंद करायचे नसल्यास नोटीफिकेशन ओपन करण्यास सांगितले. मात्र, आपल्याला हे ऑपरेट करता येत नसल्याचे पीडितेने सांगितले. यानंतर संबधित पीडितेला गूगल प्ले स्टोअर मधून ऐनी डेस्क अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. पीडितेला या ऐनी डेस्कबाबत माहिती नसल्याने तिने अॅप डाऊनलोड केले. त्याचा अॅक्सेस त्या व्यक्तीला दिला. मात्र, काही मिनिटातच तरुणीचा फोन पेचा यूपीआई नंबर मिळवत त्याने तिच्या अकाऊंटमधील तब्बल 94 हजार 990 रुपये आपल्या खात्यात वळवले.
गूगल प्ले स्टोअर मधून जाऊन हे ॲप कोणीही सहज डाऊनलोड करू शकतो. या ॲपच्या माध्यमातून कोणीही दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल, लॅपटॉप कॉम्प्युटर बसल्या जागेवरुन हाताळू शकतात. मोबाइल किंवा कॉम्प्युटरची संपूर्ण माहिती बसल्या जागेवर दिसते. पण हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या या अॅपचा कोड दुसऱ्याला दिला असेल. त्यामुळे हे अॅप एक तर वापरू नका किंवा फक्त ओळखीच्या व्यक्तीला आपल्या मोबइल, लॅपटॉप मधील अडचणी सोडविण्यासाठी सांगा.

Leave a Reply