नवी दिल्ली : १७ जून – देशात करोना महामारीत सामान्यांना महागाईच्या महामारीचा देखील सामना करवा लागत आहे. देशात पेट्रेल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मार्कंडेय काटजू हे सोशल मीडियावर खूप अँक्टिव असतात. अनेक विषयांवर ते आपले मत व्यक्त करत असतात.
दरम्यान, मार्कंडेय काटजू यांनी वाढत्या महागाईवर मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी एक ट्वीट केले आहे. ते म्हणाले, “डिझेल आणि पेट्रोल किंमती १०० रूपयाचा वर गेल्या आहेत. सरसोचे तेल २०० रूपये, एलपीजी गॅस १००० रूपयांजवळ गेला आहे. बेरोजगारी आणि बाल कुपोषण रेकॉर्ड मोडत आहेत, शेतकरी संकटात आहे, अर्थव्यवस्था बुडत आहे तसेच आरोग्याची देखील योग्य काळजी घेतल्या जात नाही”
केंद्र सरकारवर निशाणा साधताना मार्कंडेय काटजू यांनी पुढे लिहिले की, “अच्छे दिन आ गये!” सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या या ट्विटवर लोकं प्रतिक्रिया देत आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने तसंच केंद्रीय आणि राज्यांच्या करांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण दिलं आहे.