नागपूर : १६ जून – ब्रँडेड खाद्य तेलाच्या नावावर भेसळयुक्त तेलाची विक्री करणाऱ्या महाकृपा ट्रेडर्सवर नागपूरच्या तहसील पोलिसांनी धाड टाकली. यात लाखो रुपयांचे तेल जप्त करण्यात आले आहे. यावेळी अदानी ग्रुपच्या निर्मित फॉरचून तेल कंपनीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. पोलिसांनी महाकृपा ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनमधून फॉरचून कंपनीचे शेकडो पॅकिंग आणि स्टिकरसह अन्य काही कंपनीचे स्टिकर आणि ७३ हजार किंमतीचे भेसळयुक्त खाद्य तेल जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी प्रेम गंगवाणी, अशोक केसवाणी आणि शंकर दुरुगकर या तीन व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.अदानी ग्रुपच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाईअदानी ग्रुप संचलित फॉरचून तेल कंपनीच्या व्यवस्थापनाला तक्रार मिळाली, की त्यांच्या कंपनीच्या नावाने नागपूरमध्ये भेसळयुक्त तेलाची विक्री केली जाते आहे. या माहितीच्या आधारे कंपनीकडून त्यांच्या प्रतिनिधींना नागपूरला पाठवण्यात आले. त्यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल तपास केला. त्यात तथ्य आढळून आले. यानंतर त्यांनी तहसील पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात रितसर तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रार दाखल होताच महाकृपा ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनवर छापा टाकला. तेव्हा त्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खाद्य तेलाचा साठा आढळून आला.७३ हजारांच्या भेसळयुक्त तेलासह अन्य साहित्य जप्तफॉरचून तेल कंपनीचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी महाकृपा ट्रेडर्सच्या गोडाऊनवर धाड टाकली. तेव्हा १५ लिटर तेलाचे २८ पिंप, २४ रिकामे पिंप, फॉरचून तेल कंपनीचे २६ नकली स्टिकर, किंग्स कंपनीच्या 2 स्टिकरसह अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले आहे.