७ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

नागपूर : १५ जून – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात असलेल्या कोंढासावळी येथे एका नाराधामने सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अंकुश दिगंबर भोसकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने केलेला घृणास्पद प्रकारसमोर येताच चिडलेल्या नागरिकांनी आरोपीला चोप द्यायला सुरुवात केली, मात्र तो नागरिकांच्या तावडीतून निसटला, या घटनेची तक्रार दाखल होताच कोटोल पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या अवळल्या आहेत.
पीडित चिमुकलीच्या आईने या बाबत काटोल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. फिर्यादीची अल्पवयीन सात वर्षाची मुलगी गावातील प्राथमिक शाळेतील गेटजवळ मैत्रिणी सोबत खेळत होती. त्याचवेळी आरोपी अंकुश दिगंबर भोस्कर हा तिथे आला. परिसरात कोणीही नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने त्या चिमुकलीला ओढत शाळेतील बाथरूम मध्ये नेले. त्याठिकाणी आरोपीने बळजबरी करत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने पीडित मुलगी जोरात रडत होती. पिडीत मुलीचा ओरडण्याचा आवाज गावातील एका इसमाला ऐकू आला. तो पिडीतेच्या मदतीला धावून गेला असता आरोपी हा मुलीवर अत्याचार करत होता. हे पाहून त्या इसमाने मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.
आरोपीचे कृत्य बघून त्या इसमाने सर्वात आधी त्या सात वर्षीय पीडितेची सुटका केली. त्यानंतर त्या आरोपीला पकडून गावातील लोकांना गोळा केले. हा किळसवाणा प्रकार लक्षात येताच नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिकांनी आरोपीला मारहाण करायला सुरुवात करतातच आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी अरोपी अंकुश दिगंबर भोस्कर विरुद्ध कलम ३७६ अ , ५०६ भा.दं.वि. सह कलम ४,६ , बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायदा २०१२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply