रानडुकराने हल्ला केल्याने शेतमजूर गंभीर जखमी

यवतमाळ : १५ जून – शेतकर्यांचा खरीप हंगाम सुरू आहे. या हंगामात शेतकरी, तथा शेतमजूर शेती कामात व्यस्त आहे. अशातच शेतात काम करीत असताना वनोजा (देवी) येथील एका शेतमजूरांवर रानडुक्कराने हल्ला केला यामध्ये शेतमजूर गंभीर जखमी झाला असून, प्रथम वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
दि. १४ जून रोजी तालूक्यातील वनोजा(देवी)येथील शेत शिवारात शेतीची कामे करीत असताना वनोजा येथील हनूमान चिंदूजी आस्वले(३0) या शेतमजुरांवर रानडूकराने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात हा शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. आस्वले हे शेतमजूर असल्याने शेतीकामे करतात दररोजप्रमाणे ते १४ जूनला शेतामध्ये काम करण्यास गेले होते. मात्र, दबा धरून बसलेल्या रानडुकराने भरदिवसा शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांवर अचानक हल्ला केला. त्यांना प्रथम वणी येथे भरती करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

Leave a Reply