सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

भाजपाची कोल्हेकुई

प्रविण दरेकर साहेब, मी भाजपा समर्थक आहेत. पण तुंबईला जबाबदार कोण ? तुमचा प्रश्न “मुख्यमंत्री की मुंबई पालिका” असा आहे तर माझे उत्तर “भाजपा” असे आहे. मागल्या वेळी खेळलेली जबरदस्त खेळी म्हणजे मामु नी (माजी मुख्यमंत्री) मुंबई पालिका , सेनेच्या सुपुर्द केली होती. फक्त सरकार व्यवस्थित राहावे. एका मांडवली खाली, सरकारला धोका नको म्हणून अख्खी मुंबई वाघाच्या घशात ओतली. अरे !!!!! वाघंच् तो फडशा पाडणारंच्. किती ही पेपर वर कंत्राट काढा, रस्त्याचे पॅचवर्क करा…. पेपर वर…… मुंबई ची तुंबई होणारंच्. जसे ठेवलेला राजीनामा ह्यांच्या खिशातून निघत नाही, लसी साठी ठेवलेला चेक शेवटपर्यंत खिशाबाहेर निघाला नाही, तसेच् पालिका खजान्यातील पैसा!!!!!! नावंच् ह्याचे “पालिका” वाघाचे पालन पोषण करणारी आणि सर्वसामान्य जनतेला तुंबईत पोहोणे शिकवणारी.
राज्यात त्यांना कुरण नाही मिळंत, तर पालिकेत एक सोय करून दिली भाजपानी. की आपला कारभार स्वतंत्र चालवा, युती सरकारात घोळ नको. भाजपा दरेकर गड्या, तुम्हीच् ताव मारताय मुंबई ची तुंबई – अपराधी कोण? “मुख्यमंत्री की पालिका”?
तुम्ही त्यांना पालिका दिली आणि त्यांनी त्याच पैशाच्या ताकदीनिशी तुमची ऐसी तैसी केली. अक्षरशः वाट लावली, तुमच्या तोंडाला पाने पुसली.
राज्यामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बाजूला बसला इलेक्शन लढलेला वाघ, शेळी बनवून तुमच्या नाकाखाली टिच्चून नेला, तुमची मुख्यमंत्र्याची खुर्ची तुमच्या डोळ्यादेखत हिरावली आणि तुम्ही मामु (माननीय मुख्यमंत्री) असताना, त्या खुर्चीखाली काय शिजतंय, ह्याचा तुम्हाला थांग लागु नये. ही चुक निश्चितच अक्षम्य आहे. असे तुम्हाला नाही वाटंत? तुमच्या ह्या असल्या चुकीमुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला. महाराष्ट्राच्या जनतेचे हाल कुणामुळे? व्यवसायिकांना वाझेबॉंड चे रोखे विकत घेतल्याशिवाय धंदा नाही करता येत, कोणामुळे? पालघरला संत मारले जातात! कोणामुळे? तुम्ही सरकार बनविण्यात अयशस्वी झालात, त्यामुळे.
महाराष्ट्राच्या जनतेने तर तुमच्या वर विश्वास ठेवुन युतीला मत दिले होते. तुम्ही सरकार नाही बनवू शकले ही चुक कोणाची? तुमच्या चुकीचा भुर्दंड कोणी भरायचा? जनतेनी!!!!!

सबळ, भक्कम पुरावे असताना तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू साठी केंद्र सरकारला, उद्युक्त नाही करु शकत आणि जनता होरपळली जाते, हे पातक कोणाच्या माथी?????
आणि आपले दरेकर साहेब म्हणताहेत मुंबई ते तुंबई जबाबदार कोण? २५ वर्षे झालीत साहेब, मुंबई ची तुंबई दरवर्षी. पावसाळ्यात त्रास नाही झाला तर आता मुंबईला पण करमणार नाही, इतकी दरवर्षी तुंबईत तुंबलीय मुंबई.
तुमचं म्हणजे आपलं ठेवायचे झाकून आणि दुस-याचे पाहायचे वाकुन असाच प्रकार आहे. समयराजेंनी तुमचं अख्खा निवडणूक सखा गिळंकृत केला. मामु च्या पहेलवानांनी तेल लावले, पट्टा कसला आणि खालची पॅंट समयराजे घेऊन गेले, तुम्ही बसा बोंबलत, पट्ट्याच्या बक्कल शी खेळत आणि तोच् वाघ-बकरी तुम्हाला आता रोज शिव्या देतोय आणि त्याचा तुम्हाला “सामना” करावा लागतोय.
तुम्ही म्हणता आपापसात भांडुन कोसळणार. साहेब, सत्तेचे लचके तोडणारे लांडगे एकदा एकत्र आले की पाच वर्षे पूर्ण फस्त करणार.
तुम्ही बोंबलत बसा सभेत “करेक्ट कार्यक्रम-करेक्ट कार्यक्रम – करेक्ट कार्यक्रम”
एक गोष्ट मामु ची (माजी मुख्यमंत्री) मानावी लागेल त्यांनी वाझेबॉंड, परमबीर चक्र चालवुन सरकारच्या मागे शुक्ला काष्ठ लावले.
आता करेक्ट कार्यक्रम चे पडघम दिसून येताहेत. पण रोज रोज टीव्ही वर भाजपा च्या कोल्हेकुई ची गरज नाही. आम्हाला नाही मिळाली….पडेल ऊद्या….. (कोल्हेकुई)…… आम्हाला नाही मिळाली….. (परत कोल्हेकुई)……पडेल परवा……कशाला अशी वाह्यात भाषा. एकदा करेक्ट कार्यक्रम करा आणि उरका प्रोग्राम.
खरं म्हणजे लांडगा आला रे आला म्हणून जी तुम्ही रोज टीव्ही वर तुमची कोल्हेकुई सुरू आहे ना, त्यात दम नाही आणि वेळ मारून नेताय. होत काहीच् नाही फुक्कट मध्ये टीव्ही चे फुटेज खाताय. तिन्ही पक्षांना माहिती आहे आपला (ल्या) वाटा बरोबर एकाच चौकात “खाऊ चौकात” पोचतात आणि सगळ्यात धाकटा भाऊ (कळले नं वाचक हो!) पण “भागते भूत की लंगोट सही”…..आता इतके तरी मिळताहेत, भाजपा आला तर एक छदाम ही पारखा. म्हणून ……. मौसेरे भाई….. तुम्हाला काय देणार??????? सत्ता !!!!!
हे तुम्ही जे रोजचे चालवले आहे नं, आत्ता पडते…पडते…..प..ड…लीssss अरे….य्यार वाचली …..हट् यार…. हा जो वर्षभरापासून नौटंकीभरा रंगारंग कार्यक्रम सुरू आहे नं…… आणि होत काही च् नाही ह्याला जनता कंटाळली आहे. आणि साहेबांच्या करेक्ट कार्यक्रमाची वाट पाहात आहे.
आणि हे सगळं नाईलाजास्तव लिहावे लागत आहे. बाकी पक्षांनी तर सोडलीच आहे पण किमान भाजपाने राजकारणाची किमान पातळी राखणे कायम गरजेचे आहे. अन्यथा महाराष्ट्राच्या राजकारणातील आत्मा निघून जाईल.

भाई देवघरे

Leave a Reply