पय:पानं भुजंगानां ….!
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो ,
हे खरं असलं तरीही, प्रख्यात शायर
बशीर बद्र यांचा –
” दुष्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे , के कभी दोस्ती हो तो
शर्मिंदगी महसुस न हो । ” हा शेर
कायमच सर्वांसाठी लागू पडतो !
पण काही लोक मात्र दुष्मनी करताना कुठलीही गुंजाईशच ठेवत नाही !
आणि तरीही त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे करायला लाज वाटत नाही !
अशा लोकांशी बंदद्वार चर्चा धोक्याची ठरू शकते !
तुम्ही न दिलेली आश्वासनंही तुमच्या
बोकांडी बसण्याची शक्यता असते !
मागे एकदा मुख्यमंत्रीपद ” फिफ्टी फिफ्टी”चा अनुभव घेऊन झाला ना?
मग आता पंतप्रधानपद ” फिफ्टी फिफ्टी “चा अनुभव घ्यायचा इरादा आहे का ?
असल्या धोकेबाज मित्रांपेक्षा दुष्मन परवडतात !
ते पाठीमागून नाही तर समोरून वार करतात !
सापांना कितीही दूध पाजलं तरी
ते विषवमनच करतात !
कवी -- अनिल शेंडे