सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मुसलमानियत – एक आतंकवाद

Hi, “Ahmed how is your mother father”? माझा नेहमीचा ठेवणीतला प्रश्न. मुसलमान लोकांच्या आवडीचा प्रश्न आणि प्रत्येक मुसलमानाच्या घरातील दुखती रग ! How is your mother father?
Father बाहेरख्याली आणि Mother … फादरपायी पिडलेली. बुवा दर तीन-चार वर्षांत नवी सवत आणणार आणि हिचा पत्ता कटणार अन् पत कमी होत जाणार. बस् या एका वाक्यात ही भावनिकदृष्ट्या बापाचं प्रेम न मिळालेली पोरं घरातील गोष्टी आपल्यासमोर मांडणार.
“हलुल आयलंड” कतार देशाची ६०% अर्थव्यवस्था सांभाळणारं १.५ sq km क्षेत्रफळ असणारं बेट. हे बेट अगदी सुरुवातीला इराण च्या ताब्यात होते, मात्र कतार देशाचे नाविक, सागरातील मोती शोधत शोधत दूरवर निघून जात् आणि जर सागरी वातावरण ठीक ठाक नसेल तर ह्या बेटावर रात्रभर मुक्काम ठोकायचे आणि मग वातावरण नीट झाले की कतारला परतायचे. इराणला त्यावेळी ह्या बेटाचे काही विशेष महत्व नव्हते आणि म्हणून त्यांनी ते बेट कतार ला भेट दिले.
साधारण १९५० नंतर इथे क्रुड आॅईल सापडले आणि “हलुल आयलंड” चे महत्व एकदम वाढले आणि आज हे एक छोट्टेसे बेट कतार (दरडोई उत्पन्नाप्रमाणे सगळ्यात श्रीमंत देश) अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया आहे.
कतारच्या पुर्वोत्तर ८० किमी. जायला ४५ मिनिटे लागतात हेलिकॉप्टरने. साधारण दहा-बारा मिनिटे झाली की हेलिकॉप्टर मधुन कुठे ही नजर फिरवा, अथांग निळा समुद्र आणि खाली काही आकाराने भव्य तेलवाहू जहाजे, इवल्याशा हाताच्या बोटा एवढी, अथांग समुद्रात शनै: शनै: मार्गक्रमित दिसतात. सुंदर दृश्य. मानवाच्या भव्य जहाजाचं निसर्गासमोरचं खरं रूप. निसर्गाला कळतं, निसर्गसमोर माणूस थिटा आहे, बौना आहे पण निसर्ग निर्मित मनुष्याला हे कळु नये ही शोकांतिका आहे. बस एक कोरोना – सबकी फटी नां !!!!!
आमचा कॅंप समुद्राला लागून थोडा उंचावर. निळाशार समुद्र विलोभनीय दिसतो, संध्याकाळी – जेथे सागरा धरणी मिळते आणि मावळता सुर्य. विहंगम, विलोभनीय का कायसं म्हणतात नं ते!!!! बस् बघत रहा….. सुर्य मावळला की एकदम भानावर येतो आपण… अरे अंधार !!!!!!
इथला दिवस सुरू होतो पहाटे चार ला उठणे, पावणे पाच ला मेस, पाच वाजता साईट “टुल बॉक्स टॉक्स” ची वेळ. आज काय काय काम करायचे आहे, त्याबद्दल काम करताना सुरक्षा कशी करायची? वगैरे वगैरे सगळे विचार इथे मांडले जायचे मग जास्तीत जास्त साडेपाच पर्यंत साईट वर कामे सुरू व्हायची. उन्हाळ्यात १२-३ वाजतपर्यंत सुटी आणि रात्री कामं संपेपर्यंत असा दिनक्रम.
मी अहमद ला असा प्रश्न कधीच विचारला नव्हता. तो आज सहज सिगारेट पित शांत पणे उभा होता म्हणून विचारला.
अरे….. अहमद….कोण????
अहमद आमच्या सब कॉन्ट्रॅक्टर चा एक पाकिस्तानी अभियंता, दिसायला छुटका, फेंदारल्या नाकाचा सदैव टेन्शनमध्ये, पाकिस्तानी गोरा रंग, सदैव दाढी धारी, नेहमी स्मोकिंग झोनमध्ये सिगारेट पिताना. बस्… ह्याचे वर्णन एवढेच कारण साईटवर हा खुप सारे खिसे असणारे कव्हर आॅल हेल्मेट आणि सेफ्टी गॉगल ह्या पेहेरावात बघितलेला.

सब कॉन्ट्रॅक्टर चा इंजिनिअर म्हणून जास्ती जवळीक ठेवली नव्हती. हा प्रश्नही कधी त्याला विचारला नव्हता. आज सहज विचारला तर त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रुंचे ओघळ??? अरे म्हटले काय झाले????? म्हणाला सर!!!! हा प्रश्न तुम्ही कित्येकांना विचारता पण मला कधी विचारला नाही, त्याबद्दल धन्यवाद. आणि आज विचारला त्याबद्दल अनेकानेक धन्यवाद……कालंच् आई बाबांच् पुनर्मिलन झाले आणि आज तुम्ही मला हा प्रश्न विचारला.
विचारले असे काय झाले की ते आतापर्यंत विभक्त होते?
तर तो म्हणाला माझे वडिल गुंडांच्या टोळीत होते. पैसा खुप नव्हता मिळत, आम्ही खूप गरीबीत दिवस काढलेत. किती किती दिवस वडिल घरी येत नसंत. दुस-या टोळीचे गुंड आमच्या घरावर पाळत ठेवून असत. अशा दहशतीचे वातावरण आमच्या घरात आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोविस तास राहायचे. मी कसेतरी घर गहाण टाकून शिक्षण पुर्ण करत होतो तर बातमी आली की वडिल अतिरेक्यांच्या टोळीत सामिल झाले. ह्या बातमीनंतर तर त्यांचा आमचा संपर्क पुर्ण तुटला. आईला पण ते कुठे आहेत कसे आहेत हे कळायचा मार्ग खुंटला. भयंकर हलाखीच्या स्थितीत आणि मरणाच्या टांगत्या तलवारी खाली आमचे बालपण गेले. माझे शिक्षण पूर्ण झाले, जुने टोळीवाले वडिलांचे वैरी हळूहळू दिसेनासे झाले आणि वडील दहशतवादी झाले कळल्यानंतर, त्या गुंडांचा त्रास कमी कमी होत होत, बंद झाला. आम्ही दहशतीतुन बाहेर आलो मात्र उपजिविकेचा प्रश्न जैसे थे!!!! अहमद टेंस…. सिगरेट संपली….थोटुक रेतीच्या बादलीत विझविले…. परत सांगु लागला…… कसाबसा कराचीला नोकरीला लागलो, वडिलांचा पत्ता नाही पण आईला मदत करीत होतो. आणि मग नंतर मला कतार चा जॉब मिळाला आणि संपूर्ण घर सावरायला मदत झाली. आज पंधरा वर्षे झाली, वडिलांचा चेहरा पाहून असे म्हणुन तो ओक्साबोक्शी रडु लागला.
कालंच् बातमी आली की वडिल दहशतवादी संघटनेत सामील झाल्यानंतर कुठल्या एका गुन्ह्याची त्यांची, बारा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा पुर्ण झाली आणि काल ते आई कडे परत आले.
आज अहमद एकदम रिलॅक्स होता. कव्हर आॅल च्या एका खिशातून मस्त कोक च्या दोन बाटल्या काढल्या, एक मला दिली…..दुस-या खिशातून सिगारेट चे पाकिट काढले, त्यातील एक सिगारेट तोंडाला लावून सिलगावली आणि झुरके मारत मारत …धुरांची वलय हवेत सोडंत….त्या वलयातून शुन्यात पाहात, आपला आनंद व्यक्त करत होता……..

भाई देवघरे

Leave a Reply