ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठी – उदयनराजे भोसले यांची टीका

सातारा : ८ जून – राज्यातील मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जीएसटी परतावा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अशा विविध 12 विषयांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणही उपस्थित होते. ही बैठक जवळपास दीड तास चालली आणि सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या बैठकीवर भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जोरदार टीका केलीय. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच घेतल्याचं उदनयराजे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. ही भेट केवळ राजकीय तडजोडीसाठीच झाल्याचा गंभीर आरोप उदयनराजे यांनी केलाय. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्यापूर्वी अधिवेशन बोलावणं, चर्चा करणं गरजेचं होतं. मुख्यमंत्र्यांनी ते का केलं नाही? असा सवाल उदनयराजे यांनी विचारलाय. हे भेट म्हणून देवाणघेवाणीतून सत्तांतर होण्यासाठीच असल्याची टीकाही त्यांनी केलीय. ते आज सातारा इथं पत्रकारांशी बोलत होते.

Leave a Reply