नागपूर : ८ जून – नागपूर शहरातील कमाल चौक परिसर, सुनसान भाग सध्या नशेडी लोकांचा अड्डा बनला आहे. भाजीबाजार बंद झाल्यानंतर कचरा वेचणाऱ्याची काही नशेडींनी दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
कमाल चाैकाजवळ भरणाऱ्या भाजीबाजार बंद झाल्यानंतर परिसरात अंधारात गंजेटी नशेडीचा अड्डा होऊन बसला आहे. यात रात्रीच्या वेळी कचरा वेचणारे आपली पोटाची भाकर म्हणून कचरा गोळा करत फिरतात. याच ठिकाणी नशेखोर आणि त्या कचरा वेचणाऱ्यात काही तरी घडले असावे. यामुळे नशेडीने रागाचा भरात दगड डोक्यावर टाकून पळून गेले. यात त्या कचरा वेचणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मिळाली आहे.
पाचपावली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच, ते घटनास्थळी पोहोचले. यावेळी झोन 3चे पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने तेथे आपापल्या पथकासह पोहोचले. यावेळी पाचपावली आणि गुन्हे शाखेची पथकाने मृत आणि आरोपीची ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.