सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

मुसलमानियत – बुरख्याआडची मादी

दिल्ली एरोसिटी ला “हॉलिडे इन” ला उतरलो आणि संध्याकाळी डॉ. सोधी ची वाट पाहत खाली रिसेप्शन एरिया त बसलो होतो. इथला रिसेप्शन एरिया सुद्धा भला मोठा आणि करमणूक करणारा आहे. विविध देशांतील व्यक्ती इथे येतात आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्याने. मलासुद्धा ८ तासाच्या वर हॉल्ट असेल तर कंपनी इथे उतरायची व्यवस्था करायची. प्रत्येक उतरण्यात एकेका मित्राला बोलावून दोन – तीन तास मस्तपैकी घालवायचे, बढिया सोबत जेवण घ्यायचे, जुन्या स्मृतींना उजाळा द्यायचा आणि रात्री १०-११ वाजता मित्रापाठोपाठ आपण ही निघायचे अल्जेरिया साठी, हा परिपाठ, हडस शाळेचा दिपक वैद्य, अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मुकुल अग्रवाल असे कितीतरी लोकांच्या भेटीगाठी घेऊन, शेवटी जुन्या आठवणींत ताजेतवाने होऊन तीन महिन्यांसाठी अल्जेरिया….बाय बाय इंडिया…
आजचा पाहुणा माझा खास मित्र वय वर्षे ७२, आमची भेट “न्यु बुसा” नायजेरिया ची, हा आणि मी दोघेही Pre Bid Conference साठी एकत्र आलो होतो. त्यावेळी मी न्यू- बुसा ला राहत होतो. जर्मन लोकांनी बांधलेले ८ क्वार्टर्स त्यातले तीन माझ्याकडे आणि उरलेले पाच ते लोक हॉटेल तत्वावर चालवत असत. तिथे आमची भेट झाली त्यानंतर आजतागायत आमची मैत्री टिकुन आहे.
संध्याकाळी स्थान “न्यू बुसा” ह्याच्याकडे गेलो तर सोधी आणि ह्याचा इंजिनिअर दोघेही जेवत होते मी सुद्धा हातात कॉफी घेवून जॉईन झालो. ह्याचा इंजिनिअर जेवताना वैतागलेला, म्हणाला “यार कुछ अपना खाना मिलेगा कल हमको? हम दोनो तो परेशान हो गए, आठ दिनसे, चीन से घाना, घाना से नायजेरिया….. जब तक अपना खाना नहीं मिलता, पेट नही भरता” इति अभियंता. म्हटले अरे उद्या आपला लंच कॉन्फरन्स ला आहे, मी आपल्या सगळ्यांच्या डिनर साठी कुक ला सांगुन आलो आहे. ब्रेकफास्ट चं काय? हे विचारायला आलो आहे.
दुस-या दिवशी रात्री मस्त तेज छोले भटुरे आणि व्हेज बिर्यानी चा घाट घातला आणि तृप्त पंजाबी खुष झाला. म्हणाला यार आपण बाहेर किती उंची डिश मागवा, जब तक अपने मसाले मे बनी तर्री शर्री नही मिलती, पेट है के मानता नहीं….
असो अशा डॉक्टर सोधीची भेट सुद्धा दिल्लीला नेहमी प्रमाणे अविस्मरणीय ठरली, अल्जेरिया ला हा पण बरेच वर्षे होता. म्हणाला १९८७-९० अल्जेरिया खुप सुंदर देश होता. कालांतराने मुस्लिम बहुल झाला आणि दूर्दैवाने आता परिणती ह्याची गणना मुस्लिम राष्ट्रात होते आहे. Algeria is lost now. इमोशनली जरी जोडल्या गेला नसला तरी अल्जेरिया सारख्या देशाची अधोगती झाली हे पाहून, त्याला वाईट वाटले.
जुने अनुभव, हा गाणे पण सुंदर गातो, आमच्या गाण्याची एक छोटीशी महफिल सुद्धा रंगली. एव्हाना ११ वाजत आले रात्री चे. म्हणाला चल तुला ड्रॉप करत़ो एअरपोर्ट ला आणि मग घरी जातो. Take care you are going to Muslim nation, be safe, remain safe God bless you. नेहमीचा वडिलकीचा सल्ला द्यायला मात्र विसरला नाही.
जुन्या आठवणींना उजाळा देत, डॉक्टर सोधींचा आशिर्वाद पाठिशी बांधत, गाण्याच्या मैफिलीच्या धुंदीत मी शेवटी हस्सी मसौद ला उतरलो.
“हलिमा” आमच्या साईटवर क्वालिटी कंट्रोल ची २२-२३ वर्षे वयोगटातील पोरगी. साईटवर हिची माझी नेहमी भेट व्हायची. ह्या मुसलमान पोरी, परधर्माच्या माणसाशी अगदी जेवढ्यास तेवढे बोलणा-या. कामास काम एवढेच् बोलणे अवांतर गप्पा तर दुरंच्.
नेहमी कव्हर आॉल (साइटवरचा गणवेश – पुर्णपणे गळाबंद ते पायापर्यंत एकसंध) वर हिजाब (फक्त चेहरा उघडा बाकी कान, केसाला फिट्ट असा गुंडाळलेला कपडा – नाक, तोंड सुद्धा झाकता येवू शकते) घालून आणि डोक्यावर वर हेल्मेट,डोळ्यावर सेफ्टी गॉगल असा सर्व महिला वर्गाचा पेहराव साईटवर.
एक संध्याकाळी मेस तुडुंब भरली होती, मला शेवटी कोप-यात कुठे तरी एक टेबल रिकामा मिळाला. मी आपली जेवणाचे ताट भरून कोप-यातील टेबलवर जेवायला बसलो. दोन मिनिटाने नाईलास्तव कुठे ही जागा नाही म्हणून “हलिमा” माझ्यासमोर येवून जेवायला बसली, हाय-हॅलो झाले. अशाच फॉर्मल आॅफिशीयल गप्पा सुरू झाल्या. मी सहज विषयांतर करायला गंमतीत म्हटले ,” how is your boyfriend?” …… युरेका ….. युरेका…… काहीतरी घबाड सापडल्याच्या आविर्भावात तिचे डोळे चमकले…….हलिमाने सरळ मुद्द्याला हात घातला.
म्हणाली साहेब माझ्यासाठी प्लीज प्लीज प्लीज एखादा मुलगा शोधा. अगदी ४५-५० पर्यंत वर्षांचा असेल तरी चालेल.कुठल्या ही धर्माचा चालेल. हिंदू असेल तर लगेच करते लग्न, मग तो कसा ही असु दे. म्हटले तू २२-२३ ची आणि तुला नवरा का बरं पन्नाशी चा पाहिजे? म्हणाली लहानपणापासून आमच्या मनाची तयारी केली जाते की मुसलमानांमध्ये ” स्त्री” ही संकल्पना नाही. जेव्हा खुप पापी व्यक्ती जन्माला घालायची असते, तेव्हा अल्ला तिला मादीच्या रुपात, मुसलमान पुरुषांच्या सेवेसाठी पाठवितो. मुसलमानांमध्ये स्त्री ला “मादी” च्या नजरेने बघितले जाते. अगदी आमच्या घरात सुद्धा आमचे वय वाढत जाते तस तशा घरातल्यांच्या, आमच्याकडे बघण्याच्या पुरुषी नजरा सुद्धा बदलत जातात. किळस येते आम्हाला घरात सुद्धा.
मी हिंदू धर्माबद्दल वाचले आहे, तुम्ही एकपत्नीव्रत संकल्पनेत विश्वास ठेवता. तुम्हाला मुलं सुद्धा एक दोन असतात, त्यांचे संगोपन सुद्धा तुम्ही जीव लावून करता. म्हणून मला “मादी” नाहीतर “स्त्री” म्हणून जगायचे आहे. आमच्या घरी बापाला तीन बाया आणि तिघी दर वर्षी एक पिल्लू जगात आणत असतात. मुसलमान धर्मात “स्त्री” ला स्थान नाही आणि तिला मन नाही, तिला मान नाही, तिला भावना नाहीत, ती पुरुषाची एक उपभोग्य मादी जी वर्षाला एक पिल्लू जगात आणेल आणि अल्लाला धर्म वाढवायला मदत करेल. मी माझ्या बावीस बहिण भावांपेक्षा वेगळी खुप हट्ट करीत मी सिव्हिल डिप्लोमा केला आणि आता एका ६५ वर्षाच्या म्हाता-याने मला मागणी घातली आहे. बापाचा डोळा मेहेर च्या रोख रकमेवर आहे. ३मिलीयन अल्जेरियन दिनार रक्कम देणार आहे तर माझा बाप त्या म्हाता-याशी लग्न लावून, माझ्या नावाची मेहेर हडपण्याच्या फिराकीत लग्नाला होकार देतोय. आमचे बाप लोकं असेच आम्हाला देशोधडीला लावुन, स्वतः ची चैन करत असतात आणि मला सुटका नाही हे पण कळतंय…… मला जन्मभर बुरखा घालायचा नाही……मला एक मादी म्हणून जगायचं नाही…..म्हाता-याशी लग्न करून ५-१० वर्षात विधवा व्हायचं नाही……विधवा होवून झालेल्या ७-८ पोरांना कसं पोसणार???? माझं जीवन अंधारात चाललंय स्पष्ट दिसतंय…… तुम्ही सांगा सर मी काय करू?
म्हटले ह्यातुन मार्ग काढणे जरी कठीण वाटत असेल तरीही तोडगा आहे. आपले प्रोजेक्ट सहा महिन्यात संपेपर्यंत कळ सहन कर आणि आपला जपान हेड आणि एच आर जपान ला सांगु हिची ताबडतोब शक्य तितक्या लवकर बाहेर देशात बदली करा आणि हा तिढा सोडवता येईल कायमचा….मी स्वतः प्रोजेक्ट हेड ओकी तायरा ला भेटलो, परिस्थिती, वस्तुस्थिती समजावली. भेटीचे औचित्य समजाविले, मदत कर म्हणून विनंती केली. जपानी माणूस मानवाधिकार, विचारस्वातंत्र्य वगैरे वगैरे तत्सम गोष्टींना प्राधान्य देणारा. इतक्या मोठ्या कंपनीत एक माणूस – एक जागा ते ही जपानी माणसाच्या शिफारशीने …….सहज शक्य होते……….आम्हा सगळ्यांच्या प्रयत्नांना फळ आले आणि हलिमा दोन महिन्यांत कॅनडाच्या प्रोजेक्ट वर रुजू झाली………जाण्याच्या आधी हलिमा तायराच्या केबिनमध्ये गेली, जपानी पद्धतीने कमरेत वाकून जपानी नमस्कार करीत आभार मानले, त्यांना एक मोठा डबा तमिना चा (अल्जेरियन फेमस स्वीट डिश) मस्त झकास ड्रायफ्रुट घातलेला दिला…. नंतर माझ्याकडे आली दोन्ही पायांवर डोकं ठेवून नमस्कार केला……एक डबा तमिना चा माझ्या हातात दिला…….येणा-या अश्रूंना पुरती वाट करून दिली ……रडत रडत म्हणाली साहेब आज अल्ला मला हिंदू रुपात भेटला….

भाई देवघरे

Leave a Reply