मनाच्या हिंदोळ्यावर

मनाची भक्ती

आपल्या मनाची भक्ती म्हणजे काय? तर एखादी गोष्ट, एखादे मत, एखादा विचार, याविषयीचे केलेले चिंतन किंवा स्मरण होय.
एक उदाहरण, बालपणापासून आपल्या आयुष्यात अनेक घटना घडतात. काही चांगले, काही मजेशीर, काही दुःखदायक आणि ह्या साऱ्या घटना आपण आपल्या मनात एका कप्प्यात जपून ठेवतो. कधी कधी रोजच्या दैनंदिन शैलीत त्या आपसूकच स्मरणात येतात, आठवतात.
आपण काय करतो सुखाच्या, आनंदाच्या आठवणी आठवण्यापेक्षा दुःखाच्या आठवणी जास्त आठवत बसतो. त्या कशी आठवतात तर कशी कोणी आपला अपमान केला, तिरस्कार केला तेव्हा. खरोखर, ह्याची गरज आहे का? ह्या पासून खरंच काही सुख मिळणार आहे का? मनाला शांती मिळेल का? …तर नाही. एखादी घटना दुःख देऊन निघुन जाईल, गेलेल्या क्षणांनी आपण फक्त अश्रू ढाळत बसतो. पण सद्यस्थितीतील आनंद पुसून टाकतो. आनंदाचे क्षण मनात साचलेल्या दुखामुळेच ते पुसून टाकतो.
आयुष्यात आपण ह्या गोष्टी विसरतो, आपल्याला त्याचे विस्मरण होते ते हे की, कुणीतरी आपल्यावर माया करतं, कुणीतरी आपल्या पाठीवर हात ठेवतो, कुणीतरी आपलं कौतुक करतं, कुणीतरी आपल्याला आशीर्वाद देत, आपल्या सुखासाठी कुणीतरी तडजोड करतो, आणि महत्वाचं हे की, आपल्याला गरज असताना कुणीतरी आपल्याला मदत करतो, ह्याचा थोडक्यात सारांश असा की आपण विसरतो ते , “उपकार” केलेल्या उपकराबद्दल आपण कृतज्ञता बाळगायला आपण विसरतो. एखाद्याची उपकाराची जाणीव ठेवणे ही त्याने केलेल्या उपकाराची परतफेड असते. उपकार हे समोरच्यासाठी समाधान असतं आणि हेच समाधान देण्यासाठी प्रार्थना असते.
रोज सकाळी उठल्यावर, गादीवर प्रार्थना करावी, “हे देवा, माझा श्वास आज माझ्याजवळ आहे, आज मला एक नवीन सकाळ मिळाली आहे, आज हीच सकाळ मी नव्याने जगणार आहे. माझ्या हातून आजचा दिवस चागला जाणार आहे. मला ही शक्ती दे”. अशी प्रार्थना तुम्ही सकाळी रोज करा बघ तुमचा दिवस कसा सुंदर होईल.
सदैव मनात चांगल्या गोष्टींचे स्मरण ठेवा आणि हे स्मरण केवळ आपल्या भक्तीतून आपल्या ध्यान्यातून तुम्हाला मिळेल. ही स्मरणशक्ती वाढण्यासाठी तुमची ध्यान भक्ती वाढणे खूप महत्वाचे आहे.

पल्लवी उधोजी

Leave a Reply