केंद्रीय नेतृत्वाने आदेश देताच मुख्यमंत्रीपद सोडणार – येडियुरप्पा

बंगळुरु : ६ जून – कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या विषयावर अखेर मुख्यमंत्री बीएस येडियुराप्पा यांनी मौन सोडले आहे. भाजपा हायकमांडचा विश्वास असेल तोपर्यंत मुख्यमंत्रीपदी राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. केंद्रीय नेतृत्त्वाने आदेश देताच मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
“दिल्लीतील हायकमांडचा माझ्यावर विश्वास आहे, तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदी काम करणार नाही. ते सांगतील त्याच दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवस-रात्र काम करत राहे. मला कोणताही भ्रम नाही. मला त्यांनी (हायकमांड) एक संधी दिली आहे. मी त्या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहे. बाकी सर्व गोष्टी मी हायकमांडवर सोडल्या आहेत.” असे येडियुराप्पा यांनी या विषयावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
येडियुराप्पा पुढे म्हणाले की, ” मी कुणावरही टीका करणार नाही. पण कोणताही पर्यायी नेता नाही, या मुद्यावर मी सहमत नाही. राज्य आणि देशात नेहमीच पर्यायी नेते आहेत. त्यामुळे मी जिंकलो. कर्नाटकात मला पर्याय नाही, हा दावा मी मान्य करणार नाही.” येडियुराप्पांनी स्वत:च्या भवितव्यावर पहिल्यांदाच सविस्तर मत व्यक्त केले आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा यांना बदलण्यासाठी सत्तारुढ भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार हलचाली सुरू आहेत. काही मंत्री आणि आमदारांनी देखील हे मान्य केले आहे. या माध्यमातून येडियुराप्पांवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
कर्नाटकचे पर्यटन ंमंत्री आणि हुबळी-धारवाडचे (पश्चिम) आमदार अरविंद बेलाड यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीचा दौरा केला होता. त्यांचा हा दौरा येडियुराप्पांच्या विरोधात काही आमदारांंमध्ये असलेली नाराजी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांजवळ व्यक्त करण्यासाठी होता, अशी चर्चा आहे.

Leave a Reply