वऱ्हाडी ठेचा … अनिल शेंडे

मोसमी वारे !

तीन तिकडमांची आहे
अजबगजब तऱ्हा !
सारे बोलतात एकदम
एकही नाही खरा !

प्रत्येक जण म्हणत असतो
मीच बाजीराव !
वाट्टेल ते बोलून बसतात
आव पहात ना ताव !

मंत्रीच आहेत सारे
हे मान्य आहे तत्वतः !
पण अतरंगी त्यांच्या आहे
परमविराची धुर्तता !

खरं तर ही आहे
महाठगांची फौज
तिन्ही त्रिकाळ तीन म्होरके
मारून घेतात मौज !

सारेच आहेत गोंधळलेले
पण करत नाहीत टाइम वेस्ट !
माहीत नाही किती दिवस,
टिकतील ब्रह्मांडातले बेस्ट !

देवांचा इंद्र कोणाला भेटला
तर यांना दिसतात तारे !
कळून चुकलंय साऱ्यांना
कि हे तर मोसमी वारे !

  कवी -- अनिल शेंडे .

Leave a Reply