प्रिययकराने प्रेयसीवर केला बलात्कार, फोटो आणि व्हिडीओदेखील केले व्हायरल

चंद्रपूर : ५ जून – काही तरुण प्रेमातही विकृत कृत्य करतात. आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत, जोडीदारासोबत किळसवाणं कृत्य करतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत केलेलं घृणास्पद कृत्य. या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरला आहे. तरुण आपल्या प्रेयसीसोबत इतकं खालच्या दर्जाचं आणि निघृणपणे वागूच कसा शकतो? असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केलाय
संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात घडली आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या सन्मुखसिंग बुंदेल या तरुणाने आपल्या प्रेयसीसोबत किळसवाणं आणि संतापजनक कृत्य केलं आहे. आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचं गिफ्ट देतो सांगून शहरालगत असलेल्या कारवा जंगलात नेलं. त्यानंतर नराधमाने तिच्यावर तिथे बलत्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने या सर्व कृत्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर त्याने फेसबुकवर एक फेक आयडी बनवून बलात्काराचे फोटो, व्हिडीओ शेअर केले. या संतापजनक कृत्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी सन्मुखसिंग पीडित मुलीला सतत जातीवरुन अपमानास्पद बोलायचा. पीडितेला वाईट वाटेल असे शब्द उच्चारायचा. त्यामुळे तिने आरोपीला लग्नाला नकार दिला होता. याच नकाराच्या रागात आरोपीने पीडितेवर सूड उगवण्याच्या हेतून संबंधित कृत्य केलं. संबंधित घटना ही शुक्रवारी (4 जून) घडली.
संबंधित प्रकाराचे व्हिडीओ आणि फोटो शेअर झाल्यानंतर पीडितेला याबाबत माहिती मिळाली. पीडितेने थेट पोलिसात तक्रार केली. पीडितेच्या तक्रारीवरुन सायबर पोलिसांनी तपास करत पुरावे गोळा केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या

Leave a Reply