शंकरबाबा पापडकरांनी आपली डी. लीट. केली स्व. मा. गो. वैद्यांना समर्पित

नागपूर : १ जून – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ नुकताच संपला. या समारंभात अनाथांचे नाथ म्हणून ओळख असलेले शंकरबाबा पापळकर यांना मानद डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली. मात्र शंकरबाबा पापळकर यांनी ही पदवी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक दिवंगत मा. गो. वैद्य यांना अर्पण केली आहे. शंकरबाबा यांनी काल (सोमवारी) मा. गो. वैद्य यांच्या नागपूर येथील निवासस्थानी जाऊन त्यांची पत्नी सुनंदा वैद्य भेट घेतली. यावेळी त्यांनी अमरावती विद्यापीठाने सन्मानपूर्वक प्रदान केलेली डी-लिट ही पदवी अर्पण करून आशीर्वाद घेत मागो वैद्य यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
अनेक दिव्यांग अनाथ मुला-मुलींचा आधारवड असलेले शंकर बाबा पापळकर यांनी सामाजिक सेवेच्या भावनेतून १९९०मध्ये दिव्यांग अनाथ मुलांसाठी अमरावतीच्या परतवाडामधील वज्जर येथे आश्रम स्थापन केला. मा. गो. वैद्य यांचे मार्गदर्शन व विचारांच्या प्रेरणेनेच हा आश्रम स्थापन करण्यात आल्याची भावना शंकरबाबांनी व्यक्त केली. आज या आश्रमात 123 मुला-मुलींचे पालकत्त्व शंकरबाबांनी स्वीकारले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव करत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे त्यांना मानद डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली.
हा सन्मान मा. गो. वैद्य यांच्यामुळे मिळाल्याची भावना शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केली. ज्यामुळे मा. गो. वैद्य यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शंकरबाबा पापळकर यांनी मा. गो. वैद्य यांच्या पत्नी सुनंदा वैद्य यांना हा सन्मान अर्पण केला. सोबतच अनाथ आश्रमातून १८ वर्षे पूर्ण केलेल्या मुलांसाठी ठोस योजना राबवण्याचे आवाहनही शंकरबाबा पापळकर यांनी केले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा ३७वा दीक्षांत समारंभ दोन दिवसांपूर्वी संपन्न झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाइन उपस्थितीत शंकरबाबा पापळकर यांना डी. लिट. ही पदवी प्रदान करण्यात आली होती.

Leave a Reply