‘लस नाही तर दारू नाही’, ‘या’ जिल्ह्यात दारूच्या दुकानासमोर लागल्या नोटीसा……

लखनौ : १ जून – देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक चिंतेत आहेत. झपाट्याने पसरलेल्या या लाटेने कहर केला.
तसेच करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शंका देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे देशात लसीकरण केले जात आहे.
मात्र बरेच लोकं लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब नियम केला आहे.
या नियमामुळे उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर चर्चा सुरू आहे.
या शहरात लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर दारू मिळणार नाही,
अशी नोटीस लावण्यात आली आहे.
ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे.
या अजब आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हेम कुमार सिंग यांनी अलीगढ़मध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या अनेक मृत्यूनंतर ही सूचना देण्यात आली आहे.
अलीगड विषारी दारू घोटाळ्यानंतर हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली.
दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे
‘लस नाही तर दारू नाही’
अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या.
या महिन्याच्या सुरूवातीला अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला होता.

Leave a Reply