मराठा आरक्षण – प्रायोजित कार्यक्रम
“मराठा समाज” महाराष्ट्रात तीस टक्के. एक हाती सत्ता देणारा समाज. सर्व पक्षांचा डोळा मराठा समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लालायित. मात्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा एक झंझावात आला आणि गठ्ठा मते गोळा मराठा समाज – हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर फिदा झाला आणि मत देणारा शिवसेनेचा हुकमी एक्का म्हणून लौकिक पावला. तो आजतागायत परिस्थिती कायम.
मात्र जाणता राजा ने शिवसेनेचा “जयचंद” कब्जात घेतला, हिंदुत्व सोडलेली शिवसेना – शिवसैनिक पहिल्यांदा अनुभवीत होते. मविआ चा चालणारा राज्यकारभार बघितल्यानंतर तर मराठा समाजाचा शिवसेनेवरचा विश्वास उडाला. ही ती शिवसेना नाही ह्याची मराठा समाजाला खात्री पटली. मराठा मतं मिळणार नाही ही खात्री शिवसेना जयचंद, कच्चा लिंबू नेतृत्व सत्ताधीश ह्यांना सुद्धा कळुन चुकले कि शिवसेना,जाणता राजाच्या चक्कर मध्ये येवून पुर्णपणे आवळली गेली आहे आणि स्वतः ची ओळख तर हरवलेलीच् आहे मात्र जाणता राजाच्या अजगरी विळख्यात, दम तोडणार हे निश्चित, हे शिवसेना नेतृत्व अर्थात जयचंद आणि कच्च्या लिंबू च्या लक्षात आले आणि त्यातून जाणता राजा प्रायोजित “मराठा आरक्षणाचा” डाव खेळल्या गेला. वरकरणी शिवसेना ह्यातुन आपल्या सुटकेचा मार्ग समजत असली तरी अजाणतेपणी ती जाणत्या राजाच्या विळख्यात अधिकाधिक जखडंत चालली आहे. ज्याला शिवसेना आपली सुटका करण्याचे साधन समजते आहे ते जाणत्या राजाच्या दुस-या भयावह सापळ्यात अलगद फसत चालली आहे.
शिवसेनेला आता सुटका नाही. जी अवस्था जाणत्या राजानी “दलित पँथरची” करून ठेवली तसलीच अवस्था आता शिवसेनेची होणार. आठवलेंना आठवा, चार खासदार घेऊन सरकारात, सतत पलडे बदलत स्वतः ची जुनी “ओळख हरवलेला पॅंथर” ह्याला पण जाणत्या राजाने स्पर्श केला आणि पॅंथरला पाथवर ( रस्त्यावर) आणुन दैन्यावस्था केलीय. एक काळ होता दलित पँथरचा, नुसत्या नावाने मतं ओढायची किमया लाभलेला पॅंथर – महत्वाकांक्षे पोटी जाणत्या राजाचा “परिस स्पर्श” भरुन पावला आणि सर्वार्थाने पक्ष संपला. सगळे संपल्यानंतर पॅंथरच्या लक्षात आले की ज्याला आपण परिस समजत होतो, त्यानी आपल्याला कामासाठी पॅंथर चघळला आणि चोथा करून थुंकुन दिला.आता पुढला नंबर शिवसेनेचा. शंभर टक्के, लिहून घ्या….
थोडे से माजी सरकारच्या काळात जाऊ या……
जेव्हा माजी सरकार जाणत्या राजावर सरळ सरळ खरीखुरी चिखलफेक करायला लागले, जाणत्या राजाच्या निष्कामतेच्या दहा वर्षांची धज्जिया उडवायला लागले, त्यावेळेस जाणत्या राजानी आपल्या अस्तनीतील “मराठा आरक्षण” ब्रम्हास्त्र काढले जेणेकरून त्याचवेळेस चे सरकार पायउतार होण्याची नौबत झडावी. खेळी जाणत्या राजाची आणि त्याला प्रत्युत्तर चतुरस्त्र सरकारचे. डोळ्याचे पाते लवते न लवते तो ब्रम्हास्त्र त्या चतुरस्त्र सरकारने मोडीत काढले आणि जाणत्या राजाला एक शह दिल्या गेला…….और भी रास्ते है जितने के ……तुम्हारे सिवा….. चरफडत बसण्याशिवाय जाणत्या राजा कडे उपाय नव्हता. जाणता राजा संधीच्या शोधात…..
तो मौका आता जाणता राजाला मिळाला, “मराठा” समाजाची गठ्ठा मते स्वतः कडे ओढत् स्वतःचे सरकार बनवण्याची एक जबरदस्त खेळी जाणता राजा ने तयार केली.
सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर, मविआ सरकार पुर्णपणे केंद्र सरकारवर दबाव टाकत होते आणि जाणता राजा अलगदपणे “राजेना” जाळ्यात ओढत होते. अखेर जाणता राजा आणि राजे एकत्र आले. डाव कसा खेळायचा – खेळी ठरल्या आणि मराठा समाजाचा पुढारी, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे क्रेडिट घेवून त्याअनुषंगाने मराठा समाजाची मते समेटण्याचा घाट घातल्या गेला आणि जाणत्या राजाने फक्त एक हाती सत्ता पुढल्या निवडणुकीत…… फक्त आपल्या हाती….. ह्या दिशेने पावले टाकणे सुरु केले. जाणता राजा समय के साथ भी……..समय के पहले ही….
चाणाक्ष, धुर्त खेळी कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी अतिशय आतल्या गाठीची गुप्त खेळी.
फुलाच्या देशातील “राजे” ना मराठा जामानिमा घातल्या गेला. कोर्टात मुद्दाम हारलेल्या मराठा आरक्षणाला महाराष्ट्र मराठा अस्मितेचा मुद्दा बनवला गेला आणि प्रायोजित कार्यक्रम सुरू झाला.
पुर्वीच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाला कोर्टातर्फे पाने पुसली गेली. केंद्र सरकारला सज्जड दम दिल्या गेला. माजी सरकारला नेहमी प्रमाणे धारेवर धरल्या गेले. आजी सरकार कच्चा लिंबू ला ठसठशीत निरोप दिल्या गेली. मराठा समाजाला जणू राजेच् मार्गदर्शक भुमिकेत आहेत हे मराठा समाजाला समजावले गेले. आता मराठा समाजाचे कर्ते सवरते फक्त “राजे”. सगळीकडुन फिल्डिंग लावल्या गेली मराठा मतं फुटुन ती “राजेंच्या” नावानी दिल्या जातील अशी पठडी तयार केली गेली आणि “मराठा आरक्षण” मुद्यावर फुलाच्या देशातील “राजे” टीव्ही पत्रकार परिषदेसाठी अवतीर्ण झाले.
“राजे”नी खुप सुंदर भाषण ठोकले. “मराठा आरक्षणावर विजय” मिळविण्याचा जणू त्यांचेजवळ फॉर्म्युला असल्यागत. मला भाषणाची वाच्यता इथे करायची नाहीए.
मराठा आरक्षण तर मिळणारंच् आहे. ज्या अनुषंगाने १०२ कलमान्वये भाजपा ने आरक्षण दिले. ह्यावेळी तत्सम किंवा दुसरी पळवाट काढून किंवा मागील सरकारने घेतले तीचं तत्वे वापरून घेतले जाणार परंतु आरक्षणाचा कर्ता करविता हा “राजे” घोषित होणार आणि गठ्ठा मराठा मते ही राजेंकडे आकृष्ट होणार.
राजे भाषण मस्त ठोकले राव….. मगर एक गलती कर दी ठाकुर साहब…….. एक चाबी दे दी जनता के हाथ में बात करते करते, बता दी….
राजे बोलले की मी “वेगळा पक्ष सुद्धा काढु शकतो”
वाचक राजे हो ह्या वाक्यात सर्व राजकारणाचे सार आहे……
लागला क्ल्यु काही ……काय म्हणता ………सांगतो…….
जाणता राजा नी इथपर्यंत फिल्डिंग परफेक्ट लावली पण राजे नवीन पक्ष काढणार म्हणजे काय??????? एकदा मराठा आरक्षणाचे धृवीकरण “राजे” कडे झाले की बेटा भाजपा, कॉंग्रेस आणि शिवसेना बसा बोंबलत…… “राजे” मराठा गठ्ठा मतांचे सम्राट….. राजे मग वेगळा पक्ष काढणार……. अरे वेगळा पक्ष….. निवडणूक लढणे …. काय खेळ आहे??????
आमचा पुतण्या (शिवसेनेचा बरं) बिचारा इतकी वर्षे झालीत पक्ष चालविण्यासाठी कधी जाणत्या राजांसाठी पायात घुंगरू बांधतो तर कधी माजी सरकार वर नजर टाकतो काही मेहेर नजर होते का??? …..पण अजुन ही ह्या पठ्ठ्याचा जम बसत नाही आणि बिचारा बिल फाडून भाषणं ठोकतो. जा.रा. नी सांगितले की भाजपा विरोधी भाषण – भाजपा नी सांगितले की सरकार वर हल्ला बोल……. नवीन पक्ष म्हणजे गंमत नाही. हे जर तुम्हा आम्हाला कळते – ते “राजेंना” कळु नये. मग……फंडिंग…कोण?……
अर्थात जाणता राजा……जाणता राजा असे दहा पक्ष चालविण्याची ताकद ठेवून आहेत……..जाणत्या राजाची ही खेळी पुढल्या निवडणुकीतील मास्टर स्ट्रोक राहिल. “आमचे पहिलवान तेल लावून तयार आहे पण कोणी कोणी प्रतिस्पर्धी दिसतच् नाही” माजी सरकार…….आता परत …….अशीच स्तिमित करणारी खेळी……. मराठा आरक्षणाची खेळी……
राजे – मराठा आरक्षण मिळाल्यावर क्रेडिट घेत मराठा आरक्षणाचे हकदार होतील. मराठा मतं मिळविण्याचे नवीन मशीन बनेल. जसा इंदिरा गांधी ने भिंद्रनवाले ला प्लांट केला होता. तसा जाणत्या राजाने “राजेना” प्लांट केला आहे. एकदा गठ्ठा मराठा मताचे गणित पक्के बसले – जमले की राजे स्वतः चा पक्ष काढुन शिवसेनेला चेक मेट करतील. भाजपाने मराठा आरक्षण दिले हा कलंक मोडीत काढतील आणि काही अंशी त्याचा प्रभाव भाजपाची मतं कमी करण्यात होईल. आणि कॉंग्रेस नेहमीप्रमाणे ठेंगा घेऊन आऊट होईल.केंद्र सरकारने अकर्मण्यता दाखवित महाराष्ट्रात “राष्ट्रपती राजवट” लागु नाही केली तर पुढच्या निवडणुकीनंतर चित्र असे असेल.
“राजे” नवीन पक्षासह जाणत्या राजाच्या चरणी पक्ष रुजू करून मांडलिकत्व पत्करून, सरकारात भागीदार होतील आणि एकहाती सत्ता घेत जाणता राजा ची राजकन्या सत्ताधीश होईल, जयचंद आपली नोकरी सोडून जाणता राजा चे वृत्तपत्र बघतील आणि कच्चा लिंबू नेतृत्व चार सीटा घेऊन, जा. जा. राजाची चाकरी करतील आणि भतीजा नेहमी प्रमाणे त्याचपदावर चरफडत बसलेला दिसेल.
तुम्ही ह्याला जर कल्पना विलास म्हणत असाल तर, “मी पुन्हा येईन” युती जिंकुन आल्यानंतरचा कार्यक्रम बघा आणि तुम्हीचं ठरवा.
“मराठा आरक्षण आणि राजेंची नवी पार्टी” हा एक प्रायोजित कार्यक्रम आहे. सगळे ह्या विषयावर अनभिज्ञ असले तरीही जाणता राजा सगळ्यांना अंधारात ठेवून एक नवीन खेळी खेळत अग्रेसर आहे. समय समय की बात है, ये तो समय बताएगा, किसका समय आएगा।
तुर्तास “मराठा आरक्षण” एक प्रायोजित कार्यक्रम आहे.
भाई देवघरे