एबीपी माझा – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कामगिरी वर ६१% जनता समाधानी”
आपण सोशल मिडिया वर आपला आक्षेपप्रद नोंद टाकली. मात्र अशा फेक न्युजवर, फेक चॅनलवर, भाजपा आक्षेप घेत नाही आणि त्यांना पुरावे असुन कोर्टात खेचत नाही. हा मोठा महाराष्ट्र जनतेचा दैवदुर्विलास आहे. महाराष्ट्राने भाजप-सेना युतीला निवडून दिले. भाजपा आपले शासन आणु शकले नाही ह्याची किंमत सुद्धा महाराष्ट्र जनता भरत आहे.
कोणत्या नेत्याला तुम्ही गजाआड पाठवले? इतके सबळ पुरावे दिले आहेत. काय झाले? करेक्ट कार्यक्रम केव्हा? त्यात सुद्धा तुम्ही आतापर्यंत पाठवलेल्या पुराव्यांची मांडवलीच् करणार नं?
इतका मोठा सबळ पुरावे असताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याची, हिम्मत नाही ही शोकांतिका आहे.
महाराष्ट्राला फक्त राष्ट्रपती राजवट वाचवून स्वच्छ महाराष्ट्र करू शकते.
भाजपा सत्तेत यायला जर कुठल्याही पक्षाला बरोबर घेणार असेल तर ती शुद्ध मांडवली आहे. इतके मोठे केलेल्या गुन्ह्यांवर पडदा टाकणे आहे. आणि गुन्हेगार येन केन प्रकारेण परत सत्तेत येईल आणि जनतेची दिशाभूल करण्याचे चक्र चालतंच् राहणार. काय फरक तुमच्यात आणि मविआ मध्ये.
भाजपा आज अणुबॉम्ब वर बसला आहे महाराष्ट्रात. केव्हाही भाजपाची शकलं होवु शकतात. घड्याळ आणि इतर ६६ आमदार सत्तेत राहण्यासाठी भाजपा त आले तर ते सत्ता आणि पैशाखातर भाजपाशी काडीमोड सुद्धा घेवु शकतात. ही खेळी केव्हाही खेळली जाऊ शकते आणि भाजपा ची त्रेधा उडविण्याचा पुर्ण प्रयत्न असेल.
प्राप्त परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करून, सगळ्या गुन्हेगारी च्या केसेस, शक्य तितक्या लवकर निर्णयाप्रत परिस्थितीत आणून ठेवणे, जेणेकरून सर्व अपराध्यांना शिक्षा मिळेल आणि वचक बसेल. नंतर योग्य वेळ बघुन निवडणुका जाहीर करणे, हा एकच पर्याय महाराष्ट्र राज्यासमोर आहे. अन्यथा सत्तांतर म्हणजे अपराध्यांना क्षमा आणि जनतेचा विश्वासघात – असेच म्हणावे लागेल.
तुमच्या सतत च्या सत्ताधारी पक्षावर टीका आणि भ्रष्टाचाराचे आरोप – फुकाच्या वल्गना याचा कंटाळा आला आता जनतेला. दोन चार विरोधी पक्षाचे खरे अपराधी गजाआड पाठवा, तर तुमच्या आरोपांना वजन आहे,असे मानू. अन्यथा टाईमपास टीव्ही वर येऊन भाजपा महाराष्ट्र नेत्यांनी आरोपांसाठी, आपली मुंह दिखाई बंद करणे योग्य.
भाई देवघरे