नागपूर : ३० मे – आयटी पार्क, गायत्री नगर परिसरात फिरत असलेला वन्यप्राणी हा बिबटच असल्याचे अखेर सिद्ध झाले आहे. या परिसरात अचानक बिबट आढळल्याने एकच गोंधळ उडाला होता. एवढेच नाही तर परिसरातील नागरिक प्रत्यक्षदर्शी असल्याने वनविभागाच्या वतीने या परिसरात संपूर्ण दिवस-रात्र तपास करीत बिबटाचा शोध घेतला. शनिवारी प्रयत्न करूनही वनविभागाच्या हाती तो लागलाच नाही. मात्र एका आयटी कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेरात दर्शन झाल्याने या परिसरात त्याचा संचार असल्याचे निदर्शनास आले आहे.
सकाळी आयटी पार्क भागातील राष्ट्रीय ऊर्जा प्रशिक्षण संस्थेत बिबट शिरल्याने त्या परिसरात वनविभागाच्या वतीने शोधसत्र चालविण्यात आले. बिबटाचा ठावठिकाणा न लागल्याने या भागात कॅमेरा ट्रॅप देखील बसविण्यात आले आहे. दिवसभर चकमा देणारा बिबट रात्री २.१५ वाजता इंद्रपरी सॉफ्टवेअर कंपनीच्या वॉल कंपाऊंडवरून आत जाताना ट्रस्ट सिस्टिम अॅगण्ड सॉफ्टवेअर कंपनीचे सुरक्षा रक्षक ओम प्रकाश नायडू यांनी पाहिला. सदर घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली. फुटेज तपासले असता सुरक्षा रक्षकाने दिलेली माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या संपूर्ण परिसरात वनविभागाने शनिवारी दिवसभर तपासणी केली. बिबट नेमका आला कसा हे शोधण्यासाठी अंबाझरी ते आयटी पार्क या मार्गावरील सर्व वाहतूक सिग्नल्सवरील कॅमेèयाचेही फुटेज तपासण्यात आले. मात्र, त्यातूनही फारसे काही निष्पन्न झालेले नाही.
सध्या अनेक आयटी कंपन्यांमध्ये कोरोनामुळे घरूनच काम सुरू आहे. त्यामुळे कंपन्या बंद असून तिथे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. त्यामुळे, माहिती मिळण्यातही अडचणी येत आहेत. वनविभागाने या परिसरात गस्त कायम ठेवली आहे. बिबट अद्याप याच परिसरात असल्याची शंकाही व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी व परिसरातील लोकांनी सदर बिबट या क्षेत्रात वावरताना आढळल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ यावर qकवा वनविभागाचे बचाव केंद्र क्रमांक ०७१२-२५१५३०६ या क्रमांकावर तात्काळ सूचना देण्याचे आवाहन केले आहे.
या परिसरात बिबट आढळल्याने रात्रभर येथे वनकर्मचाèयांची चमू तैनात करण्यात आली आहे. शोध घेण्यासाठी येथे वन्यप्राणी बचाव दल, qहगणा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्रातील कर्मचारी असे मिळून एकूण ५० कर्मचारी दिवसरात्र बिबटाचा शोध घेत आहे. रविवारी या परिसरात असणाèया इतर सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती आरएफओ आशीष निनावे यांनी दिली.