( निरंजन टकले नावाच्या एका लेखकूने सावरकरांवर जी गरळ ओकली त्याला माझे हे उत्तर …)
सूर्य आणि काजवे …
स्वातंत्र्याचा प्रकाश ज्याने तुम्हा दाविला होता
मिणमिणणारे तुम्ही काजवे सूर्यावर थुंकता ?।।
स्वतंत्र करण्या तुम्हास ज्याने होळी अपुली केली
त्या नररत्ना दूषउनी तुम्ही क्षुद्र वृत्ती दाविली ।।
गजराजवर जसे भुंकती गल्लीमधले श्वान !
नरसिंहावर तसे भुंकती व्याघ्र गावरान !।।
म्हणविती मानव परी मस्तकी दिवाभितांचे मेंदू !
कसले लेखक हे तर असती राजकारणी भोंदू ! ।।
बघा एकदा दर्पणि अपुले लिलीपूट रूप !
कळून येइल तुमचे बापही त्याचे लघुरूप !।।
अधू बुद्धीच्या तुम्हा कळावे कसे तेज त्याचे ?
रत्नपारखी मोल जाणती सच्च्या रत्नाचे ।।
जगताच्याही इतिहासाने उठून करावे वंदन !
ऐसा नरशार्दूल विनायक भारतभूचे भूषण ! ।।
कशास आला विनायका या कर्मदरिद्री देशी ?
तुझे पवाडे कशास गातिल गुलाम परदेशी ?।।
कवी-- अनिल शेंडे ।