सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

राजीनामा

समय बलवान आहे, हेच् खरं.
बलवान गड्याला हरवायला, जसे मरतुकडे पहिलवान रडीचा डाव खेळतात त्यातलाच् हा प्रकार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, त्यांची हिंदू धर्माबद्दल निष्ठा राजकारणातील त्यांची दूरदृष्टी, राजकारणातील त्यांची दृष्टीझेप, दृष्टीक्षेप आणि ह्याउपर मातोश्री त बसुन घरबसल्या खेळल्या गेलेलं, राष्ट्रीय स्तरावर चं राजकारण. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव निघालं की चड्डीत ओली करणारा पाकिस्तान.
समयाधीशांनी अत्यंत धिम्या गतीने राजकारण खेळले. मागल्या दिलेल्या पाठिंब्याची चूक निस्तरण्यासाठी ह्यावेळी एक छुपी चाल खेळण्याचा होरा ठेवून, निवडणूक लढविली गेली. भाजपाला कसेही करून सत्तेत येवु द्यायचे नाही????
कारण काय????? अगदी स्पष्ट – निवडणुक झाल्याबरोबर शिवसेना पक्षश्रेष्ठी म्हणाले होते की “आम्हाला सुद्धा पक्ष चालवायचा आहे” पक्षश्रेष्ठी काय सांगू इच्छित होते?
“बीएमसी” त होणा-या मुंबई च्या तुंबई नंतर सुद्धा पैसा आम्हाला पुरत नाहीए, असं तर सुचवत नाही? शिवसेना पक्षश्रेष्ठी.भाजपा संगतीत सत्तेत असताना, चालवलेले राजीनाम्याचे चाळे, असेच् काही सांगून जातात. तुम्ही खात नाही, आम्हालाही खाऊ देत नाहीत, मंत्रीमंडळात कुठलंही खातं द्या, काय फायदा? मग काय घेता राजीनामा? ठेवलाय खिशात, काढून देवु टेबलावर तुमच्या?
पण दडपणाला बळी पडेल तो भाजपा मुख्यमंत्री कसला!!! राजकारणात सर्वांना पुरून उरलेला, कसलेला कार्यकर्ता म्हणजे भाजपा मुख्यमंत्री महाराष्ट्र.
सर्वांनी ठरविले भाजपा मुख्यमंत्री ला सळो की पळो करून सोडायचा कार्यक्रम. पण सर्वांना पुरून उरला तो भाजपा मुख्यमंत्री.
मग समयाधीश सज्ज‌‌‌ जाहले, भाजपा मुख्यमंत्र्याला धारातीर्थी पाडाया शरसंधान साधले आणि द्युतात पासे टाकावे त्याप्रमाणे “मराठा आरक्षण” ही अभेद्य खेळी खेळल्या गेली. सर्वांना वाटले, भाजपा मुख्यमंत्री आता समयाधीशाच्या पाट्यावर वरवंट्याखाली चिरडला जाणार. मोठा जनक्षोभ उसळणार आणि मुख्यमंत्री पायउतार होणार. संपूर्ण प्लॅन सेट आणि आता भाजपाची वाट लागणार….

पण मुख्यमंत्र्यांनी ही खेळी वेळीच् ताडली आणि वेळीच मराठ्यांच्या हवाली आरक्षण देत, द्युतातली खेळी निष्प्रभ केली. पक्षातील साथीदार पक्ष अस्वस्थ… आणि भाजपा मुख्यमंत्री रॉक्स…..
परत पुरते सगळे पिछाडीवर..
आता भाजपा ला रोखणे आवश्यक, आम्ही मुंबई ची तुंबई केली, भाजपाने बीएमसी चे कुरण आमच्या साठी सोडले तरी आमचे पोट भरत नाही ही कदाचित व्यथा. शेवटी आम्हाला ५०-५५ लाख उसने आणावे लागतात आणि आयुष्य कंठावे लागत आहे ही भाकडगाथा.
अरे!!!! पैसाच नाही येवू देत भाजपा?????? आम्ही जगणार कसे????? असं कधी होतं राव???? भाजपा जितका पैसा एखादे स्किमच्या नावानं आणतो तो सगळा च्या सगळा स्किमवर उधळतो!!!! सगळा पैसा स्किमवर जसाच्या तसा लावतो आणि काही चं नाही खावतो!!!!! असं कधी तरी होतंय राव???? आणि आम्ही तर अस्सल “बीएमसी” चे कर्तेधर्ते… आम्ही सगळे काम अगदी व्यवस्थित करतो…. पहा तपासून आमची कागदपत्रे….
तर मग काय ???? दे धौस…. आम्ही राजीनामा खिशात ठेवलाय!!!! अरे ! कुठल्या खिशात??? शर्टाच्या वरच्या खिशात, चोर खिशात, पॅंट च्या खिशात की टरबूज भरल्या मागल्या दोन खिशात???? उंहुं….. राजीनामा फक्त धौस…
समयाधीशांनी मग शिवसेनेचा कच्चा लिंबू हेरला. त्याला जाळ्यात अडकवला म्हणण्याची गरज नाही, रडीचा डाव खेळणारे असे मार्ग शोधत असतात. त्याच्या पक्षनिष्ठेचा बाप्तिस्मा केला, हिंदुत्ववादी निष्ठ काढून मुसलमानियत भरली आणि सरतेशेवटी रडीचा डाव जिंकला.
आता राजीनामा……. प्रश्नच् नाही…. समयाधीश का सरपर हाथ तो सत्ताधीश बनने की अपनी औकात… मी पुन्हा येईन ला विरोधी पक्षात बसवला…. आमचे पहिलवान तेल लावून, दंड ठोकुन तयार आहे पण समोर कोणी प्रतिस्पर्धी दिसतच् नाही…… अरे! समोर दिसणार कसा.. आपल्याच मित्र पक्षानी इमान विकुन, शत्रू शी हात मिळवून, पाठीत वार केला. ही हिंदुत्व विकलेली नामर्द राजकारणी जात. मोदी चे नावानी मत मागुन मोदींवर गरळ ओकणारी राजकारणी जात. सत्तेसाठी तत्वांना तिलांजली देणारी जात….
सरतेशेवटी रडीचा डाव जिंकला.
आता महाराष्ट्र मुलुख वेठीला आणि धंदा करायचा असेल तर या भेटीला…
पक्ष दौडवायला
वेगात दौडले परमबीर वाझे वीर,
आमची त्यांची शंभर कोटीची बात…..
फक्त मुंबई चा आकडा १०० कोटी चा…
हक्क गृहमंत्र्याचे ओटीचा…

अख्ख्या महाराष्ट्राला वेठीला धरलेला…. जीवंत धंद्यांना मारलेला. “कसेल त्याची जमीन- या कायद्यानुसार खंडणी देईल त्याचा धंदा” .
बाकिच्यांचा धंदा मंदा.
आमचं कुटुंब – आमचं पोट भरतं – आमची रयत – आमचा खड्डा.
रोज करोडोने पैसा येतो आहे म्हटल्यावर कोणता पक्ष राजीनामा देणार? फक्त कुरबुर करणार, कमी मिळतोय म्हणून. तुम्ही पण खा – आम्ही पण घ्या – शंभर कोटींच्या माळा.
असे असताना कोण कोणाचा राजीनामा देणार घेणार???
महाराष्ट्राची रयत मात्र भरडली जाणार…
पण राजकारणातील भट्टी जमली तर, सगळ्यांना सांभाळून जमवून घ्यायचे नं..
वाझे, परमबीर नी टांग मारली नी पुरता जायबंदी करून टाकलं सरकारला.केवढ्यानं जुगाड जमवुन आनलं व्हतं. तुम्ही पार त्याचं व्हत्यांचं नव्हतं करून टाकलं. वाट्टुळ्ळ झालं वाट्टुळ्ळं…
समयाधीश सत्ताधीश नाहीत, त्यांचा फोन सत्ताधीश उचलत नाही. समयाधीश आता बंदिस्त झाले. शिवसेना श्रेष्ठी मातोश्री बाहेर निघत नाही.
आपला महाराष्ट्र – आपला कोरोना – घरमैच बैठके जेब भरोना – गुजरात १००० करोड – महाराष्ट्र को १५०० करोड देव ना!!
पण आज त्रिकाल बाधित सरकार पण राजीनाम्याची भाषा कोणी करत नाही. निवडणुकीत जिंकल्यानंतर सोयीनुसार सरकार बनले की मत देणा-या जनतेला हतप्रभ होवून, होणा-या राजकारणाला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. ही आमच्या घटनेतील त्रुटी आहे. भाजपा बरोबर युती केलेल्या शिवसेनेनी मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला, भाजपाचा विश्वासघात केला, शिवसेना निवडणूक पुर्व अनधिकृत हातमिळवणी करून बसली होती समयाधीशांशी आणि त्याची परिणती मविआ सरकार बनण्यात झाली, असे देवेंद्र फडणवीस म्हणतात.
रोज रोज राजीनामा देतो म्हणणारे शिवसेना सरकार, राजीनामा खिशात आहे असे म्हणणारे सरकार, आता सत्तेत पण तुमच्या अपराधी पापांचा घडा लवकरंच् भरेल. जनता, न्यायालय यांना तुम्हाला जाब द्यावा लागेल. जैसी करनी वैसी भरनी.
काल तुम्ही “राजीनामा” खिशात ठेवून भाजपा बरोबर सत्तेत असताना उणीदुणी काढत वाटेल तसे बरळंत होतात. आज तोच् तुमचा “राजीनामा” तुम्ही केलेले अपराध, जनतेची हाय, मराठा समाजावर केलेला अत्याचार, हिंदू संताची हत्या आणि तुमची मुसलमानियत.

जनता आणि न्यायालय तुमची इच्छा नसताना बळजबरी तुम्हा द्यायला लावणार आणि शिवसेना पक्ष कायमचा अल्पांशात कायमस्वरूपी कोणाच्यातरी मांडलिकत्व पत्करून स्वतः ला तगवायचा प्रयत्न करणार. हे आता विश्वासघातकी शिवसेनेचे भीषण सत्य. एका हव्यासापोटी जीवनभराचा सत्यानाश म्हणजे शिवसेना.
साहेब, सगळ्यांचे शिव्याशाप माणूस पचवू शकतो मात्र बापाचा शाप कधी घेवु नये. कुठलाच माय का लाल पैदा नाही झाला, जो बापाचा शाप पचवू शकेल. तुमचा बाप तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे – हिंदू धर्मासाठी बाप होता. त्यांच्या अस्तित्वामुळे हिंदू धर्म महाराष्ट्रात जगला होता, तगला होता आणि जीवंत होता अशा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब ठाकरे पर्यंत आणुन सोडले. बाळासाहेबांचा शाप तर लागणारंच्. ज्या मुसलमानांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांनी बॅंड वाजविला, ज्यांच्या एका डरकाळी ने पाकिस्तान चड्डी ओली करायचा – तुम्ही त्या जमाती ला पाच टक्के आरक्षण देवुन उदोउदो करताय. मराठा आरक्षणावर राजनिती करताय. ज्या साधुसंतांकडुन नैतिकतेचे धडे घेवून राज्य सांभाळायचे, त्या साधुसंतांची हत्या झाकताय. पक्षश्रेष्ठी – तुमच्या गुन्ह्यांनी नव्वदी केव्हाच पार केली आहे. अपराधाची शंभरी कुठल्याही क्षणी होवु शकते. अपराधाची शंभरी गाठली की मग माफी नाही…
सत्ताधीश खिशात राजीनामा तयार ठेवा…. कुठल्याही क्षणी सुदर्शनचक्र कार्यरत होवु शकते……सत्तेचे शीर धडावेगळे होवु शकते.

मागल्या सरकारचे वेळी खिशात ठेवलेला राजीनामा आता समयचक्र बाहेर काढायला लावेल…. आणि तुम्हाला तो राजीनामा द्यावा च् लागेल कारण सगळे रस्ते बंद झालेले असतील आणि पर्यायशुन्य अवस्थेत तुम्ही खिशात हात घालाल्……..
समय बलवान हेचं खरं तुमच्या साठी

भाई देवघरे

Leave a Reply