पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण

नागपूर : २५ मे – कोरोना महामारीच्या काळात रुग्णवाहिका सेवा समाजासाठी सुरू करणे हे युवक काँग्रेसचे सामाजिक जाणिवेतून केलेले कार्य आहे. नगरसेवक बंटी शेळके यांनी राबविलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, अशा शब्दात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे. या सेवेचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात पार पडले.
श्वास घेण्यास आराम व्हावा यादृष्टीने रुग्णांना व्हेपोरायझर (वाफ घेण्याचे भांडे) सुद्धा मोफत दिले जाणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. नितीन राऊत म्हणाले, कोरोनाच्या या संकट काळात सामाजिक कृतज्ञता म्हणून काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी सुरू केलेला हा उपक्रम लोकांच्या उपयोगाचा आहे. युवक काँग्रेसच्या या युवा साथींनी सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविला आहे, याबद्दल डॉ. नितीन राऊत यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply