उपराजधानीत रुग्णसंख्या ५०० च्या आत, ४८२ बाधित, २९ मृत्यू , तर २००३ रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : २३ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव बऱ्याच अंशी कमी झाला आहे. उपराजधानीत तर आज कित्येक दिवसानंतर बाधितांची संख्या ५०० च्या आत आली आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ११८७नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज पूर्व विदर्भात ३४२४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्याच्या उपराजधानीत आज ४८२ नवी बाधित रुग्ण आढळून आले असून २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर २००३ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
नागपूर शहरात गेल्या २४ तासात ४८२ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या ही शहरातील रुग्णांपेक्षा जास्त दिसून आली आहे. शहरात २२७ रुग्ण आढळून आले असताना ग्रामीण भागात २४६ रुग्णांची नोंद झाली आहे तर ९ जिल्ह्याबाहेरील रुग्णांची नोंद करण्यात आली आहे शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४७१५४१ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आज २९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यातील ८ शहरातील १२ ग्रामीण भागातील तर ९ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या आता ८७६८ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात शहरात १३१२९ चाचण्या घेण्यात आल्या असून २०३१ चाचण्या ग्रामीण भागात तर ११०९८ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. आज २००३ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४५०३६० वर पोहोचली आहे तर बरे होण्याचे प्रमाण ९५.५१ टक्क्यांवर गेले आहे. शहरात सध्या १२३८४ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील ५९७५ ग्रामीण भागात तर ६४०९३ शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply