राष्ट्रीय भिकारी ….!
मामुजीची सतत ठुनठुन सुरू असते
आम्हाला हे द्या ,आम्हाला ते द्या !
तो रडतराऊत म्हणतो आहे
आम्हाला पॅकेज द्या !
कधी व्हेंटिलेटरची टरटर
तर कधी पीपीई ची किटकीट !
या भिकारडेपणाचा आता
जनतेला आलाय वीट वीट !
ज्यांना रोज शिव्यांची लाखोली वाहता
त्यांच्याच दारात कटोरं घेऊन
उभे राहता !
तुमची काहीच का जबाबदारी नाही ?
लफडी आणि खंडणीखोरी याशिवाय
काहीच कसं तुम्हाला येत नाही ?
ज्याला कुटुंब सांभाळता येत नाही
त्याने लग्न करण्याचंही कारण नाही !
एवढं भिकारडं सरकार कधी कोणी
पाहिलं आहे !
“पावसाळा आला आहे छत्र्या द्या हो”
एवढंच म्हणायचं आता बाकी आहे !
जसे राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी असतात
तसे लोक आता यांना ” राष्ट्रीय भिकारी ” म्हणतात !
कवी -- अनिल शेंडे .