तर संजय राऊत यांची भूमिका काय असेल? – प्रवीण दरेकर यांचा सवाल

मुंबई : २३ मे – शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला ब्लॅक फंगस म्हणून संबोधताच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.
विरोधी पक्षाला ब्लॅक फंगस म्हणण्याचं वक्तव्य हे मला वाटतं की कशाचंही भान न ठेवता बेभान होऊन केलेलं वक्तव्य आहे. यावरून भाजप किंबहूना विरोधकांविरुद्ध त्यांच्यात किती तिरस्कार भरलेला आहे हे या वक्तव्यावरून दिसत आहे. जर आम्ही म्हटलं की, महाराष्ट्र विकास आघाडी हाच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे तर संजय राऊत यांना आवडेल का?
राज्यात कोरोनाचे जे मृत्यू झाले आहेत रुग्ण वाढत आहेत त्याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा, निश्काळजीपणा आणि आरोग्य व्यवस्था हाताळण्यात आलेलं अपयश हेच असल्याने राज्यातील मृत्यू आणि रुग्णवाढीला जबाबदार मविआ सराकर आहे. त्यामुळे मविआ हाच राज्याला लागलेला कोरोना आहे असं म्हटलं तर संजय राऊत आपली भूमिका काय असेल.
अशा प्रकारची वक्तव्य करून केंद्र-राज्य वाद निर्माण करायचा आणि आपण मीडियाच्या माध्यमातून खळबळजनक वक्तव्य करत चर्चेत रहायचं याव्यतिरिक्त या वक्तव्याला किंमत नाहीये. त्यांचं हे वक्तव्य निषेधार्य आहे. ज्यावेळी अशा प्रकारचं वक्तव्य आमचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांच्या बाबत केलं होतं तेव्हा भाजपने सुद्धा त्यांना समज देत वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की तुम्ही संजय राऊत यांना समज देणार आहात का?

Leave a Reply