वर्धा : २३ मे – नागपूर चंद्रपूर मार्गावर जाम जवळ नागपूर वरुन चंद्रपूर कडे जात असलेल्या ट्रक चालकाचे ट्रक वरुन नियंत्रण सुटल्याने समोरील अज्ञात वाहनाला जबर धडक दिली.यावेळी ट्रक चालक स्ट्रेरींग मध्ये फसून जागीच ठार झाला.
प्राप्त माहितीनुसार, रविवार २३ मे ला रात्री १.२० दरम्यान आशयर क्रमांक एम. एच. ४९ ए.टी. ३३८५ चा चालक प्रदीप सरोदे, वय ३८ वर्षे, रा.नागपुर हा पेदापल्ली वरून आंबे घेवून नागपूरला गेला व गाडी खाली करून पुन्हा आंबे भरण्याकरीता पेदापल्ली तेलंगना येथे जात असताना चालक प्रदीप सरोदे झोपेमध्ये वाहन भरधाव वेगाने चालवून कोणत्यातरी अज्ञात वाहनास मागनु धडक दिल्याने यातील चालक प्रदीप सरोदे हा स्ट्रेरींग मध्ये फसुन जागीच ठार झाला. यावेळी ट्रकमध्ये असलेले राहुल सुधाकर वय ४८ वर्ष,गौतम शंकर नका वय २१ राहणार दोन्ही पेदापल्ली (तेलंगना) व्दारका बेनीप्रसाद गौर वय ४८ राहणार नागपुर हे जखमी झाले.अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकीला मिळताच साय्यक पोलिस निरीक्षक स्नेहल राउत, पोलिस कर्मचारी नरेद्र दिघडे, नागेश तिवारी, बंडू डडमल,दिलीप वादीले, यांनी घटनास्थळी जाऊन आयशर मधील फसलेला चालक मृतक यास बाहेर काढून शवविच्छेदनासाठी समुद्रपुर रवाना करण्यात आले. गंभीर जखमी यांना सुध्दा बाहेर काढून समुद्रपुर येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले. त्यांनतर रोडवर क्षतीग्रस्त वाहन हॉयड्राचे साहयाने रोडच्या बाजुला करून वाहतुक सुरळीत करण्यात आली. या अपघाताची माहिती समुद्रपुर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करीत आहे.