नागपूर : २१ मार्च – पूर्व विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे असे म्हणता येईल. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी जास्त होत असली तरीही अवाक्यात आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने जास्त दिसून येत आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात २३६४ रुग्णांची नोंद झाली असून ६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ५७६५ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर राज्याच्या उपराजधानीत आज १००० रुग्णांची नोंद झाली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ३१५९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
नागपुरात गेल्या २४ तासात १००० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यातील ५७६ रुग्ण ग्रामीण भागातील, ४११ शहरातील तर १३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत शहराची एकूण बाधितांची संख्या आता ४६८९३१ वर पोहोचली आहे. आज ३३ बाधितांचा मृत्यू झाला असून त्यातील १२ ग्रामीण भागातील, ८ शहरातील तर १३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहरातील एकूण मृतांचा आकडा आता ८७१८ वर पोहोचला आहे.
गेल्या २४ तासात १९१०९ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील ४९२४ ग्रामीण भागात तर शहरात १४१८५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज ३१५९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४४३१५९ वर पोहोचली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ९४.५० टक्क्यांवर गेले आहे. सध्या शहरात १७०५४ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यातील ७९७९ ग्रामीण भागात तर ९०७५ रुग्ण शहरातील आहेत.