गोंदिया वनक्षेत्रात मृतावस्थेत बिबट आढळला

गोंदिया : २१ मे – तिरोडा वनपरिक्षेत्रातील वडेगाव सहवनक्षेत्र अंतर्गत कोडेलोहारा बिटातील माल्ही येथे झुडपी जंगलात 19 मे रोजी सायंकाळच्या सुमारास मृतावस्थेत बिबट आढळून आला. दरम्यान रात्रभर घटनास्थळी बंदोबस्त ठेवल्यावर आज, 20 मे रोजी त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याच्या अंगावरील जखमेतून रक्तस्त्रोव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोडेलोहारा बिटातील माल्ही झुडीपी जंगल गट नंबर 270 येथे 19 मे 2021 रोजी सायंकाळी वन कर्मचार्यां0ना गस्ती दरम्यान मृत बिबट आढळून आले. याची माहिती मिळताच क्षेत्र सहाय्यक एम.एम.कडवे यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली व त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी एस.के.आकरे यांना सायंकाळी दिली. दरम्यान अधून-मधून पाऊस येत असल्याने व अंधार झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकार्यांतनी मृत बिबटचे शरीर त्याच ठिकाणी सुरक्षीत ठेवण्यासाठी रात्रीभर बंदोबस्त तैनात केला. दरम्यान आज, 20 मेरोजी सकाळी घटनास्थळी उपवनसंरक्षक कुलराज सिंग, सहाय्यक वनसंरक्षक आर. आर. सदगीर, तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. के. आकरे, एकोडी पशुधन विकास अधिकारी डॉ.विवेक गजरे, वडेगाव पशुधन विकास अधिकारी डॉ.विद्या वानखेडे, तिरोडा पशुधन विकास अधिकारी डॉ.रेणुका शेंडे, मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार दाखल झाले व वैद्यकीय चमूने मृत बिबटच्या शरीराची तपासणी केली. तपासणीत बिबटचे सर्व अवयव सुरक्षीत असल्याचे आढळले. तर शवविच्छेदनात बिबट्याच्या जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन कर्मचार्यांयनी व श्वान रामूच्या मदतीने जंगल परिसर पिंजून काढला. घटनेचा सर्व दृष्टीकोनातून तपास सुरु आहे, असे सहाय्यक वनसंरक्षकांनी यांनी कळविले आहे.

Leave a Reply