कोणी सरकार घेता का सरकार – महाराष्ट्र सरकार
नोव्हेंबर २०१९ अख्खा महाराष्ट्र गाजवणारा पट्टीचा पलटु –
पहाटे पहाटे मला जाग आली की सगळ्यात पहिले मिडिया च्या माईक ची भेट झालीच् पाहिजे.
तोन् नाई धुतलं अन् गान् नाई धुतली,
उठल्या उठल्या सरळ पत्रकार परिषद घेतली….
हे महाशय, ह्यांचा महाराष्ट्र सरकार बनतपर्यंतचा रोज चा हाच् परिपाठ.
माईक समोर एखाद्या मदोन्मत्त मालकाच्या पाठिंब्याचा हात असलेल्या मस्तमवाल अधिकाराच्या आविर्भावात बसणे. डोळ्यांचे हावभाव असे की जो हमसे टकराएगा… हिंदू हृदय सम्राट वचनपूर्ती …. एक बार मैने कमिट कर दिया तो अपने आप की भी नहीं सुनता… असला पत्रकार परिषदेची भाषा आणि थाट.. बॉडी लँग्वेज अशी की केंद्र सरकारचा गृहमंत्री-बंद खोलीतली चर्चा – आणि न पाळलेलं वचन…. आओ सामने – कोणाची माय व्यायली आहे??? अब तक छप्पन – सगळ्यात जास्त…आमचे छप्पन का छोंक….. तुम्हाला काय वाटतं? – आम्ही खोटं बोलतोय ?? समोरचा पक्षश्रेष्ठी खोटं बोलतो… आमची वचनपूर्ती.. समय ( घड्याळ) का सरपर हाथ तो डरने की का बात……. असे रोजचेच टीव्ही वर ह्यांचे बोल बच्चन…
फक्त भाजपा नको आणि मलापण (माझ्या पक्षातला) मुख्यमंत्री व्हायचे आहे असे रोज रोज प्रतिपादित करून, जनतेच्या मनात ठसवत् ठसवत् किंबहुना ठसवण्याचा प्रयत्न करीत, तीन ठग एकत्र आले आणि मविआ सरकार अस्तित्वात आले.
ज्या मतदारांनी भाजपा-शिवसेना युतीला मत देवुन प्रचंड मताधिक्यानी विजयी केले, त्या मतदारांच्या भावना दुखावत्, हिंदू जनमानसांच्या मतांचा अनादर करीत, केवळ सत्तेसाठी आपल्या जुन्या भाजपाच्या मैत्रीवर पाणी सोडंत् हे त्रि- काल (घड्याळ)- बाधित एकत्र आले.
बाळ जन्मला गं सखे बाळ जन्मला च्या धर्तीवर महामहिम, सरकार कसे चालते-ह्याचा बाळबोध नसणारे, फक्त पक्ष चालवू शकणारे, महामहिम सत्ताधीश झाले. पुत्रप्रेमाखातर लायक शिवसैनिकांना डावलून आपल्या बाळाला मंत्रीपदावर विराजमान केले.
कालचक्र सुरू झाले, प्रकार तोच् सरकार झाल्यावरही, तोन् नाई धुतले…..गान् नाई धुतली….. शिरस्त्यावर रोजच्या पत्रकार परिषदा…..आमचे सरकार अस्से… आमचे सरकार तस्से……भाजपा सरकार अस्से पाडणार….. भाजपा सरकार पाडणार कस्से? है कोई माय का लाल…… भाजपा सरकार पाडणार…….आमचे समयाधीश असे सांगतात- ह्यांना मोदी पण मानतात- मोदीला ह्यांनी बोट धरून शिकविला अन् आम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या पाटावर बसविला…
सगळे रोजचे सकाळी उठल्या उठल्या बोल बच्चन ऐकायला मिळायचे.
भाजपाने कुठलाही आरोप केला की भाजपा सत्ता हालवते आहे.. भाजपाला सत्ता हवी आहे..भाजपाला सत्ता अस्थिर करायची आहे…. अशी उत्तरे देत, उंदराला मांजर साक्ष – तीन्ही ठग एक पक्ष मांडित. आणि भाजपा शांतपणे सांगत होते, बाप हो आम्हाला सरकार पाडायची गरज नाही, परस्पर विरोधी तत्वांनी एकत्र आलेले हे सरकार, आपापसात त्रांगडं होवून गचकणार्. हे ठामपणे सांगत होते आणि सांगत आहे.
सरकार व्यवस्थित चालु की सरकार चालू आहे – हे कळायला मार्ग नाही. मात्र ह्या सरकारमध्ये सगळी जनता भरडली गेली, हे स्पष्ट जाणवत आहे. कोरोना सुद्धा उपचाराअभावी लोकं मरताहेत. ह्या सरकारमध्ये कोणाचा कोणात पायपोस नाही, हे सुद्धा जाणवते. महाराष्ट्र जनता त्रस्त, बेहाल अतिशय वाईट नेतृत्वाखाली महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे.
आणि एक दिवस “वाझे” प्रकरण मार्केट मध्ये आले. शांतपणे जनतेला दाबुन सरकार जमा करत असलेली अनधिकृत पुंजी आणि त्यापायी अगतिक जनता.
त्यात गोवले गेलेल्या मंत्र्यांची नावे आल्यावर……
सकाळी सकाळी उठल्या उठल्या होणा-या पत्रकार परिषदेची वेळ बदलली, त्या आता दुपारी होवु लागल्या … कधी बाहेर कुठे तरी, तर कधी आॅफिस मध्ये होवु लागल्या. प्रश्न ठराविक उत्तरे तीच्….. भाजपा सरकार अस्थिर… कार्यदक्ष अधिकारी वाझे… इमानदार परमबीर… सत्तेबाहेर भाजपा ला करमत् नाही.
बॉडी लँग्वेज सुधारलेली, जुना रोब बोंबललेला. सरकार चालवणे गंमत नाही पटलेलं, फुकाचा माज उतरलेला. स्पष्ट शब्दात वर्षा दीड वर्षात केलेल्या चुका कळलेल्या, वर्षा बंगल्यात बसणे सोप्पे नाही- हे पण पटलेले पण जनतेला दाखविण्याची सोय नाही. म्हणून कळकळ मनात दाबुन चार गोष्टी आपली मिडिया – आपला माईक वरून मोदींना ज्ञान पेलायचे, की सरकार कसे चालवायचे?? आपला महाराष्ट्र – आपले फाटके नेतृत्व… अजुन काय?
महाशय इतके सोबर बोलु शकतात हे महाराष्ट्र जनतेनी पहिल्यांदा अनुभवलेलं. महाशय लाईनीवर आले हे अनुभवलेलं… झालेल्या चुकांचं बोचरं बोचकं बोडख्यावर घेऊन सरकार मार्गस्थ.
आणि अचानक वाझे आणि परमबीर – १०० कोटी- पत्र गृहमंत्री, समयाधीश, झळ बहुतेक वरपर्यंत, फटाक्यांची माळ….. वगैरे वगैरे……
सोबर महाशय अतिशय सौम्य वाणीत आपली मिडिया – आपला माईक – आपले पत्रकार – आपल्या खिशात आपलं वेगळाले रुप घेवून अवतीर्ण झाले. “मी पहिलेच् सांगितले होते – त्याला परत घेवु नका….. पक्षश्रेष्ठींनी ऐकले नाही….जे होईल सत्य समोर येईलच्- वगैरे वगैरे….(साहेबांनी ५२ लक्ष भरले, तेव्हासुद्धा सत्य बाहेर आले) वगैरे वगैरे …… म्हणजे चक्क कधी मधी हे महाशय पत्रकारांना मध्यात सोडुन पळु लागले- कधी कधी पत्रकार परिषद टाळु लागले …. तर कधी कधी केंद्र सरकार यॉंव.. केंद्र सरकार त्यॉंव…दोन बोल केंद्रालाउपदेशपर…महाशयांनी बॉडी लँग्वेज थोडी सिकुडलेली … रोजचे बोल, सौम्यपणा, थोडासा धीटपणा, तो सुद्धा गेलेला…. शिवसेनेच्या मंत्र्यांची नामुष्कीने करावी लागलेली हकालपट्टी-मात्र समयाधीशांचे मंत्री बाबत शिवसेना- चारी मुंडे चित- गृहमंत्र्यांची स्वगृही रवानगी … वाझे परमबीर हे महागात पडलेलं प्रकरण…. अंगावर येवू घातलेलं… समयाधीशांबरोबर जो कोणी गेला त्याचा पोपट झाला हे कळलेलं पण समय(घड्याळ) का फेरा…. जो वादा किया वो निभाना पडेगा….. फस तो गए हैं बाहर निकालना तो पडेगा….सोच कर हैरान हु….. निकालने का रास्ता कसा होगा …
सुंभ जळाला पण पीळ जात नाही….असह्य हे सगळे काय करावं सुचत नाही..हे सगळे भाव महाशयांच्या चेह-यावर दिसाया लागलेले. ना ना विध कॉंग्रेसी लोकं पण टोला माराया लागलेले, समयाधीश घरी बोलावून अंगावर बोंबलून राहिले की झकं मारली नी त्येला सत्ताधीश केला…… सगळं कसं जमवून आणलं होतं पण जमलं नाही.. अंकुश ठेवता आला नाही…. आणि सगळं उघडं पडलं….. भाजपा म्हणाली हेच खरं तर नाही ठरणारं… आपापसातील मतभेदाने तर सत्ता भेदली नाही जाणार??? ….. काय होणारं…… भविष्य अंधारलेलं दिसतंय….. पैसा भरपूर…. पण. इभ्रत????? इभ्रत वाचवणं नाही जमलं….. हे सगळे हावभाव.. आताशा प्रत्येक पत्रकार परिषदेत जाणवायला लागले.. बॉडी लँग्वेज अजुन श्रिंक झालेली- चौडे खांदे आताशा खाली पडलेले- चेहरा उतरलेला पण सुंभाचा पीळ कायम असल्याची चाललेला हतबल प्रयत्न…
काल भाजपा च्या एका नेत्याला प्रत्युत्तर देताना अक्षरशः जाणवत होते, “पुढल्या निवडणुकीत भाजपा ला केंद्रात ……
अवसान गळलेलं, भाव गळलेला पत्रकार परिषदेत, भाजपा पण सत्तापालट करायला तयार नाही… आम्हाला सत्ता चालविता येत नाहीये… आम्ही निरंकुश, मदोन्मत्त इतके मस्तमवाल झालो होतो की एक एक प्रकरण आवरता आवरता नाकी नऊ येतंय्… ज्या समयाधीशाने आम्हाला सत्ताधीश बनवले आज त्या समयाधीशाला स्वतः ला बंदिस्त करून घ्यायची वेळ आम्ही आणली आहे, किती मौका दिला … पण भाजपा जवळ येत नाही अन् सत्ता पाडत पण नाही… खेळलेल्या खेळाचा पार विचका झालाय….मराठा आरक्षण द्यायचे आहे पण कोंडी करतात इतर दोन पक्ष… ह्या दोन्ही पक्षांनी आम्हाला ठगवलंय्….
असे कितीतरी भाव कालच्या दोन मिनिटांच्या पत्रकार परिषदेत, चष्म्याआडून ह्या महाशयांच्या डोळ्यात भासले…. खरंच कुठं संपंल् हे कळत नाहीए… वैताग आलाय ….सत्ताधीश होण्याची सजा भोगतोय…..सत्तेच्या पटावर आहोत, पाटावर आहोत का पाट्यावर आहोत आणि वरवंटा फिरायची वाट बघत आहोत….. नको ही सत्ता … नको हे महाराष्ट्र सरकार… मनात तरी किती साठवायचे… सत्तेच्या वचनाचं बोचकं..बोचरं झालंय…. सत्ताधीश एकांतात समयाधीशांचा फोन सुद्धा उचलत नाहीए…. सगळं विस्कळीत विस्कटलंय….पण जनासमोर एक अवाक्षर काढायची सोय नाही…… कुढतोय असाच् मनातल्या मनात…. आणि रडतोय जुन्या अक्षम्य चुकांमुळे….. शिवसेना स्वबळावर कधीच नाही जिंकणार…. शिवसेनेचा मालकाला त्याच्यानंतर दुस-या पक्षाचे मांडलिकत्व पत्करण्याशिवाय पर्याय संपलेत……सत्तेचं ओझं निस्तरता निस्तरता नाकी नऊ आलेलं……. सत्ता उपभोगता येत तर नाहीच पण चालवता सुद्धा येत नाही…….. मनातच् रडतोय ……चुकीला माफी नाही…….. आणि मनाच्या गलबल्यातुन भरल्या गळ्याने, मनातल्या मनात, भरल्या अंतःकरणाने जगाला विचारतोय….
“कोणी सरकार घेता का सरकार…. महाराष्ट्र सरकार”
भाई देवघरे