पंतप्रधानांनी साधला जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद

नवी दिल्ली : १८ मे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अनेक राज्य आणि जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी थेट अधिकाऱ्यांकडून करोना संक्रमण हाताळणीचे त्यांचे अनुभव जाणून घेतले. ग्रामीण क्षेत्रातील संक्रमण रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर पंतप्रधानांनी या बैठकीत जोर दिला तसंच अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
आपापल्या राज्यांत आणि जिल्ह्यांत कोविडवर नियंत्रण मिळवला तर देश आपोआपच करोनावर नियंत्रण मिळवू शकेल, तुम्हाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार, जे गरजेचं ते करा, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना योग्य कामासाठी फ्री हॅन्ड दिला.
अधिकाऱ्यांना ‘फिल्ड कमांडर’ म्हणून संबोधताना ‘तुम्ही सर्वच या लढाईचं नेतृत्व करत आहात’ असं म्हणत पंतप्रधानांनी अधिकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. या बैठकीत काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही हजेरी लावली.

Leave a Reply