पैचान कोन?
लस उपलब्ध नाही कारण साठा नाही. साठा आहे पण लसीकरण होणार नाही. याचा अर्थ असा नाही की लसीकरण बंद आहे. लसीकरण सुरूच आहे. सर्वांना लस मिळेल. याचा अर्थ कुणीही जाऊन लस घेऊ शकतो असा नाही. नोंदणी करा मग लस मिळेल. पण नोंदणी केली तरी लस मिळेलच असं नाही. पण लसीसाठी नोंदणी आवश्यक आहे असं म्हणतायेत.
किंबहुना माझ्या नावानं जास्त लसलस करु नका. “लस्सी” त बुडवून काढीन. ह्याचा अर्थ असा नाही की लस्सी तुम्हाला पिऊ देईन. पण बुडलेच् आहात लस्सीत तर प्यायला हरकत नाही.
आता जर तुम्ही लस्सीत बुडून लस्सी प्यायला असाल तर तुम्हाला “लसीची” गरज नाही. ह्याचा अर्थ असा की लस्सी फुलप्रुफ आहे आणि तुम्ही लस न घेता फक्त बुडून माझी “लस्सी” प्यायला तर कोरोनाप्रुफ झालात. अशा प्रकारे महाराष्ट्र कोरोना प्रुफ करण्याचे तंत्र आम्ही शोधून काढले आहे.
एक माजी मुख्यमंत्री जे नुसते बडबड करुन फडफड करीत असतात, त्यांना विनंती आहे की आमच्या “लस्सी” ला कोरोना मुक्तीकरणाला मेडिकल काउन्सिल कडून मान्यता आणावी. काही ही गडबड न करता.
लस्सी साठी दर दिवशी २०००० टन मलाई चे दही, २०००० टन साखर, ५०००० लस्सी कामगार, १५००० नंबर १०० लिटर चे गंज केंद्र सरकार कडून द्यावे. आणि यंत्रणा राबवायला २०० कोटी दर दिवशी केंद्र सरकार कडून द्यावे.
आम्ही तर “लस्सी” करण शिवथाळी बरोबरसुद्धा द्यायला तयार आहोत. “लस्सी” सुद्धा शिवथाळीत देत आहोत ह्याचा अर्थ असा नाही की शिवथाळी चा रेट वाढेल. आणि खाणा-याने विचार करावा की त्याच रेट मध्ये “लस्सी” पण कशी काय मिळेल? आता शिवथाळी घेणा-याला कळायला पाहिजे की त्याच रेट मध्ये “लस्सी” पण कशी काय मिळेल? किंबहुना ह्याचा अर्थ असा नाही की लस्सी चे वेगळे पैसे आम्ही घेऊ.
बाकी आमची पुर्ण तयारी आहे “लस्सी”करणाची.
पण केंद्राची तयारी आहे का? “लस्सी” करणाची??
मनातली मळमळ, डोक्यातील शब्दसंपदा, पत्रकारांपुढे गरळ ओकण्याची क्षमता संपली आणि “पैचान कौन” ने पत्रकार परिषदेमधुन पळ काढला.
पत्रकार १: अरे हा तर पळाला बडबड करून आणि सगळं केंद्रावर ढकलून! प्रश्न विचारायचा चान्सच् नाय.
पत्रकार २: अरे बरं झालं ह्याच्या पोरांचं लग्न व्हायचं आहे. नाहीतर नातू होत नाही ह्याचे खापर सुद्धा ह्यानी केंद्र सरकार वर फोडलं असतं.
माझं कुटुंब – माझी जबाबदारी
माझं सरकार – केंद्र सरकार ची जबाबदारी
भाई देवघरे