गोंदिया : १५ मे – रावणवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कामठा येथील एका इसमाच्या घरी पोलिसांनी धाड घालून साठवणूक केलेला ८ लाख ४३ हजार रुपये किमतीचा ७०.२५० किलोग्रॅम गांजा पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी आरोपी घनश्याम उर्फ सोनू हरिश्चंद्र अग्रवाल (२५) रा. कामठा याला अटक करून त्याची १७ मेपर्यंत पोलिस कोठडी घेतली आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास केली.
कामठा येथील एका इसमाच्या घरून अंमली पदार्थाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर गुरुवार 13 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा कारवाई केली. यावेळी पोलिसांनी आरोपीच्या घरून एका प्लॅस्टिकच्या पिशवीत 70किला 250 ग्रॅम गांजा आढळला. या गांजाची किंमत 8 लाख 43 हजार रुपये सांगितली जाते. या प्रकरणी आरोपी घनशाम उर्फ मोनू अग्रवाल याला अटक करून रावणवाडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आराोपीला 14 मे रोजी न्यायालयात सादर केले असता सोमवार 17 मेपर्यंत न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी ठोठावली आहे. सदर कारवाई पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांच्या नियंत्रणाखाली पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, पोलिस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहायक फौजदार गोपाल कापगते, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, अर्जुन कावळे, भूवनलाल देशमुख, पोलिस नायक महेश मेहर, रेखलाल गौतम, सनेवालाल भिलावे, इंद्रजित बिसेन, तुलसीदास लुटे, पोलिस कॉन्स्टेबल विजय मानकर, महिला पोलिस शिपाई सुजाता गेडाम, चालक पोलिस कॉन्स्टेबल विनोद गौतम यांनी केली.