सेकंड हँड कार खरेदी करण्यासाठी दाम्पत्याने बाळ विकलं…….

लखनौ : १४ मे – उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका दाम्पत्याने कार खरेदी करण्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याला विकल्याच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे.
या दाम्पत्याने आपल्या नवजात बाळाला एका व्यावसायिकाला दीड लाखांना विकलं आणि त्या पैशातून सेकंड हँड कार विकत घेतली.
आजी आजोबांनी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिल्यानंतर संबंधित प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी नवजात बाळाच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
कन्नौजमधील तिरवा कोतवाली भागातील सतौरमध्ये तीन महिन्यांपूर्वी नवजात बाळाचा जन्म झाला होता.
मात्र पैशाच्या हव्यासापोटी आणि कार विकत घेण्यासाठी दाम्पत्याने नवजात बाळाला गुरसहायगंज येथील एका व्यावसायिकाला विकलं.
अवघं तीन महिन्यांचं बाळ दीड लाख रुपयांना त्यांनी व्यावसायिकाच्या हाती सुपूर्द केलं.
तसेच बाळ विकल्यानंतर आठ दिवस कुणालाही याची कुणकूण लागू दिली नाही.
मात्र नातवाच्या आजी आजोबांना ही बाब लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
तक्रार ऐकून सुरुवातीला पोलिसांनाही धक्का बसला.
त्यांनी  या प्रकरणी दाम्पत्याची चौकशी केली आणि सदर घटनेचा खुलासा झाला.
आई कोविड सेंटरमध्ये; अवघ्या पाच दिवसांच्या मुलीची जबाबदारी वडिलांवर
“नवजात बाळ अजूनही व्यावसायिकाच्या ताब्यात आहे.
या प्रकरणी आम्ही दाम्पत्याची चौकशी करत आहोत. या दाम्पत्याने नुकतीच एक सेकंड हँड कार खरेदी केली आहे”,
असं पोलीस निरीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply