वर्ध्यात उत्पादन झालेल्या १७ हजार रेमडेसिविरची पहिली खेप केली वितरकाच्या स्वाधीन

नागपूर : १४ मे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी वर्धा येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस या कंपनीतून निर्माण करण्यात आलेल्या १७ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची पहिली खेप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत वितरकांच्या सुपूर्द करण्यात आली. जिल्हाधिकार्यांमार्फत ही इंजेक्शन्स नागपूर व महाराष्ट्रात वितरीत केली जातील.
नितीन गडकरी यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना फोन करून रेमडेसिविर इंजेक्शन्सचा स्टॉक वितरित केल्याबाबतची माहिती दिली व राज्यात आवश्यकतेनुसार या इंजेक्शनचे वितरण करण्याची सूचनाही केली. त्यांच्याच प्रयत्नातून वर्धा येथे 5 मे पासून या इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. आतापर्यंत 1 लाख इंजेक्शन्सची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ही जीवनरक्षक इंजेक्शन्स पोहोचविली जाणार आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दूरध्वनीवरून वर्धेतील जेनेटिक लाईफ सायन्सेसमधील रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली व राज्यात त्याचे योग्य नियोजन करून वाटप करण्यासंदर्भात चर्चा केली.

Leave a Reply