वर्चस्वाच्या लढाईत तडीपार गुंडाचा भरदिवसा खून

नागपूर : १४ मे – वर्चस्वाच्या लढाईत ईदच्या दिवशी भर बाजारात एका गुंडाचा दोघांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाल इथल्या गांधी गेट जवळील शिवाजी पुतळा चौकात सकाळी ही घटना घडली. ईदच्या दिवशी हा रक्तपात झाल्याने परिसरात खबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू उर्फ शहानवाज खान(वय ३५) असं खून झालेल्या कुख्यात तरुणाचं नाव आहे. तर सौरव आणि प्रविण घाटे अशी आरोपींची नावं असून या दोघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. सोनू आणि घाटे हे दोघेही वेगवेगळ्या गुंडांच्या टोळीसाठी काम करत होते.
सोनू याच्यावर या पूर्वीही मारहाणीसारखे अनेक गंभीर प्रकारचे गुन्हा दाखल आहेत. वर्षभरापूर्वी पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. अशाच गुंडगिरीतून सोनूला ईदच्या दिवशीच तूझा हिशेब करेन अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. आज सकाळी तो शिवाजी पुतण्याकडून जात असताना त्याच्यावर प्रविण आणि सौरवने धारदार शस्त्रांनी वार केले. यातच सोनूचा मृत्यू झाला.
दरम्यान, या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सोनूचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply