उधारीची रक्कम वसूल करण्यासाठी मित्रानेच केला मित्राचा खून

चंद्रपूर : १४ मे – उधारीची रक्कम देण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर मित्रानेच तरुणाचा जीव घेतला. भाजी कापण्याच्या तीक्ष्ण सुरीने भोसकून २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भर दुपारी भर चौकात झालेल्या या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उधारीवर घेतलेल्या एक हजार रुपयांच्या कारणावरुन मित्रानेच भाजी कापण्याच्या सुरीने २६ वर्षीय सुकराम अलाम याच्यावर भर गर्दीत वार केले. त्यानंतर २१ वर्षीय आरोपी निलेश ढोक याने स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयातच अटक करण्यात आली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात भरदुपारी गर्दीने गजबलेल्या चौकात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. निलेश ढोक याने आपला मित्र सुकराम याला १ हजार रुपये उसने दिले होते. मात्र सुकराम ते परत देत नव्हता.
या कारणाने संतापलेल्या निलेशने भाजी कापण्याच्या धारदार सुरीने सुकराम अलाम याची गर्दी असलेल्या गांधी चौकात वार केले. आरोपी निलेश ढोकने हत्या केल्यावर स्वतः जखमी मित्राला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपीला रुग्णालयात जाऊन बेड्या ठोकल्या.

Leave a Reply