वऱ्हाडी ठेचा ….अनिल शेंडे

। आरक्षण ।

ज्याने मिळवून दिलं आरक्षण
त्याच्याशी कृतघनपणा केला
आणि ज्यांनी ते घालवलं
त्यांच्याशी घरठाव केला !

आता कितीही पटक पटक केली
तरीही काही फायदा नाही
पण तुम्हाला गाजर दाखवायचे
भामटे काही सोडणार नाही !

मुस्लिमांना आरक्षणाचा मेवा
त्यांनी कधीचाच दिला !
पण त्यांचा हा सेक्युलर कावा
तुमच्या लक्षातच नाही आला !

आरक्षणाची ही गाजरं
पुरे झाली आता !
अति आरक्षणाने कमजोर
होईल भारतमाता !

 कवी -- अनिल शेंडे

Leave a Reply