नागपूर : १२ मे – नागपूरसह पूर्व विदर्भात मागील काही दिवसात कमी झालेली रुग्णसंख्या सुखावणारी असली तरी रुग्णांचे होणारे मृत्यू यात फारसा फरक पडलेला दिसत नाही. मागील काही दिवसात रुग्णसंख्या कमी झाली व कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे परंतु कोरोनामुळे रुग्णांचे होणारे मृत्यू काही केल्या कमी होताना दिसत नाही. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात १४० बाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ५४१५ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ९७३४ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. राज्याच्या उपराजधानीत गेल्या २४ तासात ६७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत तर २५३२ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत तर ५७०८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
आज नागपूर शहरात २५३२ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यात १२०० रुग्ण ग्रामीण भागातील १३१९ शहरातील तर १३ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहराची एकूण रुग्णसंख्या आता ४५६३८० वर पोहोचलेली आहे. तर गेल्या २४ तासात ६७ रुग्णांचे मृत्यू झाले असून त्यात १९ रुग्ण ग्रामीण भागातील ३५ शहरातील तर १३ इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृतकांची संख्या ८३२५ वर पोहोचली आहे.
आज शहरात १७१६१ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ४७५१ ग्रामीण भागात ते १२४१० चाचण्या शहरात घेण्यात आल्या. आज ५७०८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४०४७०२ वर पोहोचली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ८८.६८ टक्क्यांवर गेले आहे. सध्या शहरात ४३३५३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यातील २१२४३ ग्रामीण भागातील तर २२११० शहरातील रुग्ण आहेत.