पुणे : १२ मे – पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्यावर ३ राऊंड फायर करण्यात आले आहे. सुदैवाने अण्णा बनसोडे थोडक्यात बचावले आहे.
पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले.
पोलिसांनी धाव घेऊन तानाजी पवार याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल सुद्धा जप्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहे.