रानडुकराची शिकार करणाऱ्या ६ आरोपींना अटक

गडचिरोली : १० मे – चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्रातील कोनसरी उपक्षेत्रात येत असलेल्या कोनसरी नियतक्षेत्रात जंगली डुकराची शिकार करणार्या सहा आरोपींना वनविभागाच्या अधिकार्यांनी अटक केली.
अम्रीश आनंद मंडल (२६), चंद्रजीत चित्ता मंडल (२५), बबलू चित्तरंजन वैद्य (२५) सर्व रा. बहादूरपूर, संदीप भैय्याजी गुरूनुले (३२), करण संजय गुरूनुले (२३), आकश राजू कावडे (२३) सर्व रा. कोनसरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मार्कंडा वनपरिक्षेत्रांतर्गत नियत क्षेत्र कोनसरी येथे जंगली डुकराची शिकार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. निर्मळ यांचे मार्गदर्शनाखाली कोनसरीचे क्षेत्रसहायक व वनकर्मचार्यासह घटनास्थळी जाऊन आरोपींचा शोध घेतला असता वरील सहा आरोपी आढळून आले. घटनेची चौकशी करण्याकरिता त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी जंगली डुकराची शिकार करून विक्री करण्याची कबुली दिली.
वनाधिकार्यांनी सहा आरोपीविरुद्ध वनगुन्हा दाखल करून वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,४८ (ए), ५0 व ५१ अन्वये कार्यवाही करण्यात आली. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply