अनियंत्रित वाहनाच्या धडकेत १ ठार तर ५ जखमी

बुलढाणा : १० मे – बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील छोट्या देवीसमोर एक अनियंत्रित वाहनाने चार ते पाच जणांना उडविले. या अपघातात एक जण जागीच ठार तर चार ते पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. भरधाव कार क्र. एम.एच. 28 ए. झेड. 2632 शहरातील छोट्या देवी समोरून जात असताना अचानक कार चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित झाली यामध्येच चार ते पाच जणांना धडक दिली. या अपघातात मधुकर शंकर जाधव वय 60 वर्ष राहणार शांतिनिकेतन नगर बुलढाणा यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर कार चालक कार घेऊन चिखलीच्या दिशेने पळून जात होता. मात्र पुढे हाजी मलंग दर्गा जवळ त्याची हँडल लॉक झाल्याने कार जागीच थांबली. अपघात झाल्यानंतर काही लोक त्याचा पाठलाग करत होते. पाठलाग करणनार्या नागरिकांनी त्या कार चालकाला पकडुन आधी चोप दिला व नंतर कारच्या काचा फोडल्या. नंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. तर या अपघातातील जखमींचा उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply