विरोधी पक्षनेत्यांविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई

वाशीम : ९ मे – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर व्हायरल करणाऱ्या तीन जणांविरोधात जऊळका रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. भाजपाचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली होती.
प्राप्त माहितीनुसार किन्हीराजा ‘जिल्हा परिषद सर्कल’ या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सदर ग्रुप मध्ये पोस्ट करून देवेंद्रजींच्या शरीरयष्टीबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता तर दुसऱ्या एका सत्य कधीच पराजित होत नाही या गृपमध्ये एका व्यक्तिने रेमडेसिविरचा इंजेक्शनचा संदर्भ देत विरोधी पक्षनेतेद्वय देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकार यांच्या बाबत आक्षेपार्ह मजकूर व्हायरल केला आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हा महामंत्री नागेश घोपे यांनी जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीवरून जऊळका पोलीसांनी तिंघाविरूद्ध कारवाई केली आहे.

Leave a Reply