चंद्रपूर : ७ मे – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता, ते गाडीखाली उतरले. त्याचवेळी गजराजने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात गौरकार मृत्यूमुखी पडले.
जलद कृती दल तसेच वनाधिकारी तिकडे धावले आणि हत्तीला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करू लागले. त्या परिसरातील गावांना सतर्क करण्यात आले आहे. कारण गजराज त्याच भगत फिरत आहे. गजराजला शोधण्याचे सर्व प्रयत्न केले जात असल्याची माहिती रामगावकर यांनी दिली आहे.